वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करणे सामान्य गोष्ट नाही. जवळजवळ ५० वर्षांच्या वनडे क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात केवळ एक खेळाडू १५ हजारहून अधिक धावा करू शकला आहे. भारताच्या “मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा केल्या नाहीत.
परंतु, या लेखात सध्याच्या तीन भारतीय फलंदाजांविषयी सांगणार आहोत, ज्यांना आगामी काळात वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावा करता येतील. त्या तीनही फलंदाजांची प्रकृती चांगली आहे आणि त्यांची तंदुरुस्ती व वय लक्षात घेत वनडे क्रिकेटमध्ये ते १५ हजार धावा करू शकतात असे म्हणता येईल.
३. केएल राहुल (KL Rahul)
केएल राहुल एक जबरदस्त फलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या फक्त ३२ वनडे सामने खेळले आहेत आणि त्यातील ३१ डावात ४७.६५ च्या सरासरीने १२३९ धावा केल्या आहेत. केएल राहुलने वनडे कारकीर्दीत आतापर्यंत ४ शतक आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत. तो ५ वेळा नाबादही राहिला आहे.
केएल राहुल आता अवघ्या २८ वर्षांचा आहे आणि तो नियमित भारतीय संघाकडून खेळत आहे. केएल राहुल वरच्या क्रमांकावर खेळतो आणि तेथे त्याला मोठे डाव खेळण्याची संधी मिळते. जर त्याला भारतीय संघाकडून नियमित संधी मिळाली तर असे म्हणता येईल की, केएल राहुल वनडे क्रिकेटमधील १५ हजार धावांचा आकडा गाठू शकतो. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्येही आहे आणि येत्या काही वर्षांत तो निश्चितपणे भारतीय क्रिकेट संघाचा एक मोठा फलंदाज असल्याचे सिद्ध होऊ शकतो.
२. रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा देखील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधला एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २२४ वनडे सामने खेळले आहेत आणि ४९.३ च्या सरासरीने ९११५ धावा केल्या आहेत. वनडे सामन्यात त्याने २९ शतके आणि ४३ अर्धशतके झळकावली आहेत. तर त्याने ३ दुहेरी शतकेही ठोकली आहेत.
रोहित शर्मा सलामीवीर असून एकदा का तो खेळपट्टीवर सेट झाला की त्याची मोठी खेळी निश्चित असते. ३३ वर्षांचा रोहित शर्माची तंदुरुस्ती जर बरोबर असेल तर तो ५-६ वर्षे अधिक खेळू शकतो आणि यावेळी तो १५ हजारांचा जादुई विक्रमही साध्य करू शकतो. या विक्रमापर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी थोडे कठीण असले तरी त्याच्यासारख्या फलंदाजासाठी काहीही अशक्य म्हणता येणार नाही.
१. विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली जगातील नंबर एकचा फलंदाज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे.
विराट कोहलीने आतापर्यंतच्या २४८ वनडे सामन्यांमध्ये ११८६७ धावा केल्या आहेत. त्याची उत्कृष्ट फिटनेस पाहता असे म्हणता येईल की त्याच्याकडे अजूनही ७-८ वर्षे अधिक खेळण्याची क्षमता आहे. जर त्याने पुढील ५ वर्षे जरी आणखी वनडे क्रिकेट खेळले तर वनडे क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे नक्कीच आहे.
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजीत अव्वल असणाऱ्या सचिन तेंडुलकरचे गोलंदाजीतील हे २ पराक्रम ऐकून आश्चर्य वाटेल!
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे