क्रिकेटची सुरुवात ही कसोटी क्रिकेट पासून झाली. कसोटी क्रिकेटमध्ये संयम ठेवून खेळावे लागते. यामध्ये फलंदाज जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करतो आणि मोठ्या धावा करतो. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी खूप संयम असणे आवश्यक आहे. राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसनसारखे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाले आहेत, कारण हे खेळाडू मोठ्या सयंमाने आणि एकाग्रतेने खेळून खेळपट्टीवर टिकून राहतात.
कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांनी बऱ्याच वेळा फलंदाजांना कडवे आव्हान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सामान्याच्या चौथ्या डावात फलंदाजांची खरी परीक्षा असते. कारण खेळपट्टी पूर्णपणे फुटलेली असते आणि अशा परिस्थितीत खेळपट्टीवर टिकून राहून धावा जमवणे फलंदाजाला कठीण जाते.
कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात कोणत्याही फलंदाजाने चांगली फलंदाजी केल्यास त्याच्या संघाची यशस्वी होण्याची शक्यता वाढते. तसेच, कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात अधिक धावा करणाऱ्या फलंदाजास सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. असे बरेच भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात खूप धावा केल्या.
या लेखात कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज-
३. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)- १३९८ धावा
‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर हे त्यांच्या काळातील दिग्गज फलंदाज होते. त्या काळात फलंदाजाला हेल्मेट नव्हते, अशावेळी जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग आणि कोर्टनी वॉल्श सारख्या धोकादायक वेस्ट इंडीज वेगवान गोलंदाजांचा त्यांना सामना करावा लागला. त्यांनी या गोलंदाजांचा सामना करत धावाही केल्या. यामुळेच प्रत्येक क्रिकेटपटू त्यांचा खूप आदर करतो.
त्यांची फलंदाजीच अशी होती की, ते एखादा खेळपट्टीवर उभे राहिले, की त्यांना बाद करणे खूप अवघड जायचे. त्यांनी एकूण १२६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी १०१२२ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावातही त्यांनी अनेक उत्कृष्ट डाव खेळले आहेत. गावस्कर यांनी चौथ्या डावात ५८.२५ च्या शानदार सरासरीने एकूण १३९८ धावा केल्या आहेत. तसेच ३३ डावात ९ वेळा नाबाद राहिले. तर यादरम्यान त्यांनी ४ शतकेही केली.
कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात दुहेरी शतक ठोकणारे ते जगातील एकमेव फलंदाज आहेत.
२. राहुल द्रविड (Rahul Dravid) – १५५२ धावा
‘द वॉल’ राहुल द्रविड हा भारतीय संघाचा सर्वात विश्वसनीय खेळाडू होता. त्याच्या संयमी खेळीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे मोठे नाव आहे. त्याने आपल्या शानदार आणि तंत्रशुद्ध फलंदाजीने भारतीय संघासाठी बरेच सामने जिंकून दिले आहेत.
द्रविडने १६४ कसोटी सामने खेळले त्यात १३२८८ धावा केल्या आहेत. यात त्याने ३६ शतके तर ६३ अर्धशतके झळकावली आहेत.
राहुल द्रविडने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात भरपूर धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात ४०.८४ च्या सरासरीने एकूण १५५२ धावा केल्या आहेत, तर तो ५६ डावांमध्ये १८ वेळा नाबाद राहिला आहे. या दरम्यान त्याने १ शतक देखील झळकावले आहे.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) – १६२५ धावा
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची कसोटी क्रिकेट कारकीर्द उत्कृष्ठ आहे. कारकिर्दीत त्याने भारताकडून कसोटी सामन्यात अनेक चमकदार खेळी केल्या आहेत. सचिन तेंडुलकर हा कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे.
सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा केल्या. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील चौथ्या डावातही शानदार कामगिरी केली आहे. त्याने ६० डावांमध्ये ३६.९३ च्या सरासरीने १६२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि ७ अर्धशतकेही केली.
चौथ्या डावात सचिनने सर्वोत्तम फलंदाजी २००८ मध्ये चेन्नई येथील कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध केली होती, जेव्हा भारतीय संघासाठी शतकी खेळी करून ३८७ धावांचे विशाल लक्ष्य गाठले होते.
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजीत अव्वल असणाऱ्या सचिन तेंडुलकरचे गोलंदाजीतील हे २ पराक्रम ऐकून आश्चर्य वाटेल!
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे