---Advertisement---

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांना पुरेसा वेळ मिळत असल्याने मोठी खेळी उभारण्याची संधी असते. २०२० वर्षात कोरोना व्हायरसमुळे भारतीय संघ केवळ ९ वनडे सामनेच खेळू शकला, त्यामुळे अनेक खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. तरीदेखील काही खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत काही उत्तम खेळी केल्या आहेत. वर्षाच्या शेवटी सर्व खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे गरजेचे असते, तर या लेखात आपण २०२० वर्षामध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात अग्रेसर ठरलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

३. श्रेयस अय्यर- १०३ धावा (विरुद्ध न्यूझीलंड)

वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात, श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केले. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात क्रमांक ४ वर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रेयसने १०७ चेंडूत १०३ धावांची उत्तम खेळी केली. या खेळीत त्याने १ षटकार आणि ११ चौकारांचा पाऊस पाडला होता. परंतु ही शतकी खेळी करूनही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.

२. केएल राहुल- ११२ धावा (विरुद्ध न्यूझीलंड)

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने २०२० वर्षात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात राहुलने ११३ चेंडूत ११२ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने २ षटकार आणि ९ चौकार लगावले होते. दुर्दैवाने या सामन्यात भारताला ५ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.

१. रोहित शर्मा- ११९ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा २०२० वर्षात सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे रोहितने या वर्षात केवळ ३ वनडे सामने खेळले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने १२८ चेंडूत ११९ धावांची उत्तम खेळी केली होती. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ८ चौकारांची आतिषबाजी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला होता.

ट्रेंडिंग लेख-

भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

महत्त्वाच्या बातम्या-

हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! भक्कम बचाव असलेला पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत

लाईव्ह सामन्यादरम्यान विराटने केले धोनीला मिस; कोहलीच्या रिऍक्शनने जिंकली सर्वांची मने; Video भन्नाट व्हायरल

धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---