---Advertisement---

असे तीन भारतीय खेळाडू, जे २०१८ दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा होते भाग, पण यंदा वनडेत संधी नाही

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 3:21 PM
virat kohli
---Advertisement---

-Sharad Bodage

सध्या भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. नुकतीच पार पडलेली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका भारताने २-१ ने गमावल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा दिला. १९ जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केएल राहुलने या अगोदर कधीही अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपद सांभाळले नव्हते.

भारताने शेवटचा दक्षिण आफ्रिका दौरा २०१७-१८ मध्ये केला होता. त्यादरम्यान संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण ६ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत संघाने जबरदस्त खेळ दाखवला होता आणि शानदार पद्धतीने ५ सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली होती. यावेळी भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळत आहे. पण यंदाच्या भारतीय संघात असे ३ खेळाडू नाहीत, जे २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताकडून एकदिवसीय मालिकेत खेळले होते. त्याच तीन खेळाडूंचा या लेखात आपण आढावा घेऊ.

३.अक्षर पटेल
मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फिरकी गोलंदाज अष्टपैलू अक्षर पटेलला संघात सामाविष्ट करण्यात आले होते. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या शानदार कामगिरीमुळे अक्षरला खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच अष्टपैलू केदार जाधवसुद्धा संघाचा भाग असल्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अक्षर पटेलचा २०२१-२२ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सामावेश करण्यात आलेला नाही. त्याला दौऱ्यापूर्वी दुखापत झाल्याने त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.

२. मोहम्मद शमी
भारतीय संघ २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता, तेव्हा मोहम्मद शमी एकदिवसीय आणि कसोटी मालिका या दोन्ही संघांचा भाग होता. जरी तो भारतीय एकदिवसीय संघाचा भाग असला, तरी त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे दोन वेगवान गोलंदाज सर्वच एकदिवसीय सामने खेळले होते.

मोहम्मद शमीचा २०२१-२२ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघात सामावेश करण्यात आला होता, मात्र एकदिवसीय मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे एकदिवसीय मालिकेत प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघाचा भाग आहेत.

१. कुलदीप यादव
२०१७-१८ च्या दक्षिण अफ्रीका दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत कुलदीप यादव हा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे. त्याने ६ एकदिवसीय मालिकेत १३.८८ च्या सरासरीने १७ गडी बाद केले आहेत. कुलदीप यादव २०१९ च्या विश्वचषकानंतर संघात नियमीतपणे स्थान मिळवू शकलेला नाही. रविचंद्रन अश्विनच्या एकदिवसीय संघात पुनरागमनामुळे कुलदीप यादवला भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळू शकलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर पाहून व्हाल चकीत! भारतच नाही, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही स्थान नाही

Video: ‘तुला गर्लफ्रेंड आहे का?’, कपिल शर्माच्या प्रश्नावर पृथ्वी शॉने दिले ‘हे’ उत्तर

धोनीच्या शिष्याला क्विंटन डी कॉकने ‘धोनी स्टाईल’मध्ये धाडले माघारी, पाहा व्हिडिओ

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---