दक्षिण आफ्रिका संघ हा जगातील एक मजबूत व प्रबळ संघ मानला जातो. हा संघ परदेशात कसोटी विजय मिळवणाऱ्या संघांपैकी एक. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणे तसे फारच कठीण. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया सोडले तर कोणत्याही देशाला आफ्रिकेत ३पेक्षा जास्त कसोटी सामने जिंकता आलेले नाही. 3 Indian Captain to Win Test Match in a South Africa Country.
भारतीय संघ या देशात १९९२ पासून एकूण २० कसोटी सामने खेळला व त्यात केवळ ३ सामन्यात संघाला विजय मिळवता आला आहे. तर तब्बल १० सामन्यात भारताने येथे पराभव पाहिला आहे. ७ सामने अनिर्णत राहिले आहेत.
६ भारतीय कर्णधार आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने खेळले आहेत. त्यात एमएस धोनी २०१० ते २०१३ मध्ये सर्वाधिक ५, मोहम्मद अझरुद्दीन ४, राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर व विराट कोहली प्रत्येकी ३ तर सौरव गांगुली कर्णधार म्हणून २ सामने दक्षिण आफ्रिकेत खेळला आहे. यात केवळ ३ कर्णधारांना दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात विजय मिळवता आला आहे.
३. राहुल द्रविड (Rahul Dravid)
२००६-०७मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी सामने खेळले होते. यात जोहान्सबर्ग येथील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताने १२३ धावांनी विजय मिळवला होता. ८ विकेट घेणारा श्रीसंत यात सामनावीर ठरला होता. भारत या मालिकेत १-२ने पराभूत झाला.
२. एमएस धोनी (MS Dhoni)
२०१०-११मध्ये कर्णधार धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यात भारताने पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला होता. डर्बन कसोटीत व्हिव्हीएस लक्ष्मणच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने कसोटी सामना जिंकला होता. ही मालिका भारताने १-१ अशी बरोबरीत सोडवली होती.
१. विराट कोहली (Virat Kohli)
२०१८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यात भारताने पहिल्या दोन कसोटीत पराभव पाहिल्यानंतर तिसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने ६ विकेट्स व ६६ धावा केल्या होत्या. त्यालाच या सामन्यात सामनावीर पुरस्कार दिला होता. भारत ही मालिका १-२ने पराभूत झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
–भारतात एकही कसोटी सामना न जिंकणारे ३ महान कर्णधार
–एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले