भारताच्या क्रिकेट संघामध्ये अनेक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या उत्तम खेळीने चाहत्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजी आणि शतक हे समीकरण फलंदाजांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आवडीचीच गोष्ट असते. कसोटी सामन्यातही खेळाडू आपल्या शतकी खेळीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु काही खेळाडू असेही आहेत. ज्यांना आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकही शतक स्वत:च्या नावावर करता आलेलं नाही.
आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकही शतक न झळकवणाऱ्या यादीमध्ये असलेल्या तीन खेळाडूंचा या लेखात आपण आढावा घेऊ.
अजय जडेजा
कसोटीत शतक न करणाऱ्या फलंदाजांमध्ये अजय जडेजाचा समावेश आहे. अजय जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १९९२ रोजी कसोटी सामन्यांत पदार्पण केले होते. १५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ५७६ धावा केल्या. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, एकही शतक मारण्यात त्याला यश मिळाले नाही. त्यांची सर्वोत्तम खेळी ९६ धावांची राहिली. कसोटीत जरी अजय जडेजाला शतक करता आले नसले, तरी वनडेत त्यांनी ६ शतके केली आहेत.
आकाश चोप्रा
क्रिकेट विश्वास सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आकाश चोप्राने २००३ साली न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी कारकिर्दीत १० कसोटी सामने खेळले. यामध्ये २ अर्धशतकांसह ४३७ धावा केल्या आहेत. मात्र, त्यांना शतक करता आले नाही. त्यांची सर्वोच्च खेळी ६० धावा अशी राहिली. म्हणजेच शतकाच्या जवळही ते या १० कसोटींमध्ये खेळताना पोहचू शकले नाहीत.
अभिनव मुकुंद
साल २०११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या अभिनव मुकुंदने ७ कसोटी सामन्यांत ३२० धावा केल्या आहेत. त्याला कामगिरीत सातत्य राखता न आल्याने तो संघातून आत-बाहेर होत राहिला. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये जरी त्याची कामगिरी चांगली असली तरी, त्याला भारताकडून कसोटीत एकदाही शतकी खेळी करता आली नाही. त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१७ साली गॉल येथे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ८१ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्यांचा विक्रम मोडला त्या कपिल पाजींचं आश्विनला खास पत्र; लिहिलंय, ‘तू एक दिवस…’
मंकडींगच्या नियमात बदल झाल्याने विभागली दिग्गजांची मतं; सचिनचा पाठिंबा, तर ब्रॉड म्हणतोय…