क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा खेळवल्या जातात, परंतु विश्वचषकाची मजाच निराळी असते. दर ४ वर्षांच्या अंतराने विश्वचषक खेळला जातो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्याने एकदा तरी आपल्या देशासाठी विश्वचषक खेळावा आणि तो जिंकावादेखील. ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही, त्यांना पुढील विश्वचषकात खेळण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि आपली योग्यता सिद्ध करावी लागते, तरच त्यांना संधी मिळण्याची शक्यता असते.
भारतीय संघात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी भारताला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. कपिल देव, सुनिल गावसकर, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, राहुल द्रविड अशा अनेक खेळाडूंचा यामध्ये समावेश होतो. जरी यातील काही खेळाडूंनी निवृत्त झाले असले, तरी त्यांच्या महती अविस्मरणीय राहिली. परंतु, भारतीय संघात असेही काही दुर्भागी खेळाडू आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची सांगड घातली आहे, तरीही त्यांना एकदाही विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही.
तर बघूयात कोण आहेत ते दिग्गज भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी एकदाही विश्वचषक खेळलेला नाही. 3 Indian Players Did Not Play World Cup Ever
व्हिव्हिएस लक्ष्मण
भारताचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण यांच्या दमदार फलंदाजीचे अनेक चाहते दिवाने होते. आपल्या धाकड फलंदाजीने त्यांनी क्रिकेटविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. वनडेत ८६ सामन्यात त्यांनी २३३८ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या उल्लेखनीय ६ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश होता. तर, कसोटीत या उजव्या हाताच्या फलंदाजाने १७ शतके आणि ५६ अर्धशतकेही केली होती. शिवाय कसोटीत त्यांच्या सर्वाधिक धावा या त्रिशतकाच्या जवळपास म्हणजे २८१ इतक्या होत्या.
अशा चांगल्या आकडेवारींनंतरही लक्ष्मण यांना त्यांच्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकदाही विश्वचषक खेळण्याची संधी मिळली नाही.
इशांत शर्मा
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा गेल्या १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्याने कसोटीत ९७ सामन्यात २९७ विकेट्स घेतल्या आहेत. तर, वनडेत ८० सामन्यात ११५ आणि टी२०त १४ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कपिल देव यांच्याव्यतिरिक्त कसोटी सामन्यात ४ वेळा ६ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय वेगावन गोलंदाज आहे. एवढ्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही इशांतला विश्वचषकात खेळण्याची संधी अद्याप तरी मिळालेली नाही. २०१५मध्ये त्याची भारतीय संघात निवड झाली परंतु दुखापतीमुळे त्याला विश्वचषकाला मुकावे लागले.
अमित मिश्रा
भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा २००३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याने वनडेतच ३६ सामन्यात ६४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने जवागल श्रीनाथ यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक १८ विकेट्स घेण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली होती. तरीही त्याला आतापर्यंत एकदाही वनडे विश्वचषकात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेटमधील पुढील फॅब ४ होण्याची क्षमता असलेले ४ खेळाडू
-टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ५ भारतीय फलंदाज
-भारतीय संघाच्या ‘या’ ५ दारुण पराभवामुळे चाहते झाले होते…