१९३२ साली भारतीय क्रिकेट संघाने त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला. सुरुवातीला भारतीय संघाला कसोटीत जास्त विशेष कामगिरी करता आली नव्हती. परंतु, वेळेनुसार भारतीय संघात चांगले खेळाडू येत गेले आणि भारतीय संघाच्या प्रदर्शनात सुधारणा होत गेली. आज भारतीय कसोटी संघ जगातील कोणत्याही संघाला मजबूत टक्कर देण्याची क्षमता राखतो. याचे श्रेय भारतीय कसोटी संघाला आतापर्यंत लाभलेल्या उत्कृष्ट कर्णधारांना जाते. कारण, भारतीय कसोटी संघात असे कित्येक कर्णधार होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या शानदार नेतृत्त्वाच्या जोरावर संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. या कर्णधारांमुळे भारतीय कसोटी संघाला क्रिकेटविश्वात एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
बऱ्याचदा असे दिसून येते की, संघात दमदार प्रदर्शन करणाऱ्या दिग्गज खेळाडूंना काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळते. अनिल कुंबळे हे याचे उत्तम उदाहरण आहेत. २००७ साली त्यांना भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यांनी १४ कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले. परंतु, एका वर्षाच्या आत त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले गेले. पण, अनेक दिग्गज खेळाडूंना त्यांच्या दमदार प्रदर्शनानंतरही संघाचे नेतृत्त्व करण्याचे सौभाग्य प्रात्प होत नाही. या लेखात, भारतीय कसोटी संघातील ३ मुख्य खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांना आतापर्यंत एकदाही संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.
भारतीय संघातील ३ मुख्य खेळाडू, ज्यांना नाही मिळाली संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी – (3 Indian Players Don’t Get Chance Of Captaincy Of Test Team)
इशांत शर्मा –
२००७ साली बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणारा इशांत शर्मा हा त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने भारताकडून आत्तापर्यंत ९७ कसोटी सामने खेळत २९७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ११ वेळा एका कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याचा आणि एक वेळा एका कसोटी सामन्यात १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तो भारतीय कसोटी संघातील वरिष्ठ गोलंदाज आहे, पण त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळालेली नाही.
आर अश्विन –
आर अश्विन या अष्टपैलू क्रिकेटपटूने कमी वेळेत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. अश्विनने २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. पण, त्याला आतापर्यंत एकदाही भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. अश्विनने आतापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३६५ विकेट्स घेतल्या आहेत. तर, ४ शतकांच्या मदतीने २३८९ धावा केल्या आहेत.
चेतेश्वर पुजारा –
उजव्या हाताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत पुजाराने ७७ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १८ शतके करत ५८४० धावा केल्या आहेत. तसेच, पुजाराच्या कसोटीतील वैयक्तिक सर्वोच्च धावा या २०६ इतक्या आहेत. पण, त्याला आतापर्यंत एकाही कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.
ट्रेंडिंग लेख –
लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज
आयपीएल २०२०: युएईमध्ये शतक झळकावू शकतात हे मुंबई इंडियन्सचे ३ धडाकेबाज फलंदाज…
वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला धोनी म्हणतो, काय रे म्हाताऱ्या
३७ चेंडूत खणखणीत शतक करताना आफ्रिदीने वापरली होती या भारतीय क्रिकेटरची बॅट
कारगिलमध्ये भारताविरुद्ध लढण्यासाठी अख्तरने सोडले होते 1 लाख 75 पाऊंड्सवर पाणी