आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी सर्व संघ तयारीला लागले असून, त्यासाठी सर्वांनी त्यांचे १५ सदस्यीय संघाही घोषित केले आहेत. विश्वचषकातील भारताच्या अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध सामन्याने होणार आहे.
आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर जेव्हा-जेव्हा विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना झाला आहे, त्यातील सर्वाधिक वेळा भारतीय संघाने पाकिस्तानवर वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय संघात सध्या दिग्गज फलंदाज आणि गोलंदाज खेळत आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देऊ शकतात. या लेखात आपण पाहणार आहोत असे तीन खेळाडू ज्यांना पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील सामन्यामध्ये त्यांच्या कामगिरीमुळे सामनावीर पुरस्कार मिळू शकतो.
१. रोहित शर्मा
समोर कोणताही गोलंदाज असला, तरी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहीत शर्मा धावा करण्यासाठी ओळखला जातो. रोहितने मायदेशाव्यतिरिक्त परदेशातही भारतीय संघासाठी सतत चांगली कामगिरी केेली आहे. तो फक्त मोठे शाॅट नाही, तर मोठी खेळीही खेळतो. पाकिस्ताविरुद्ध त्याने आतापर्यंत १८ सामन्यात ७२० धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि सहा अर्धशतक सामील आहेत. त्याचा आयपर्यंतचा इतिहास पाहता असे वाटते की तो पाकिस्ताविरुद्ध चांगली कामगिरी करु शकेल आणि सामनावीर ठरेल.
२. विराट कोहली
भारतीय कर्णधार विराट कोहलीची फलंदाजीमध्ये काय करू शकतो सर्व जगाला माहित आहे. विराट कोहलीने आतापर्यंत पाकिस्तान विरोधात १३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने दोन शतक आणि दोन अर्धशतक ठोकत ५३६ धावा केल्या आहेत. तो फलंदाजी करताना धावा करण्यासाठी नेहमी आतुर दिसत असतो. फक्त पाकिस्तानच नाही तर जगभरातील सर्वच गोलंदाजांना त्याच्याविरोधात गोलंदाजी करताना घाम फुटतो. तसेच अनेकांसाठी कोहलीला गोलंदाजी करणे म्हणजे सन्मानाची गोष्ट असते. अशात तो पाकिस्तानविरुद्धच्या टी २० सामन्यातही चांगली कामगिरी करून सामनावीर पुरस्कार मिळवू शकतो.
३. जसप्रीत बुमराह
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी सर्वांनाच माहित आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. याच मालिकेदरम्यान त्याने कोसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये नियमीत अंतरावर विकेट्स घेण्याच्यासाठी ओळखला जातो.
त्याने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध केवळ तीन सामने खेळले आहेत आणि यामध्ये चार विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र, तो सध्या त्याच्या जबरदस्त फार्ममध्ये आहे आणि पाकिस्तानी फलंदाजांना त्याच्यापासून सर्वात जास्त धोका आहे. तो पाकिस्तानविरुद्ध चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करून सामनावीर ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास आरसीबीच्या ‘या’ फलंदाजांना धावा कराव्याच लागतील, गंभीरचे भाष्य
टी२० विश्वचषकात कोहली ‘या’ बाबतीत अव्वल स्थानी; ख्रिस गेलसारख्या फलंदाजालाही टाकले मागे
हेडन बनला पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक तर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लागली ‘या’ दिग्गजाची वर्णी