भारतात जेव्हा क्रिकेटचा सामना खेळला जातो, त्यावेळी स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेले असते. सामना कुठेही असो तरी देखील प्रेक्षक आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात हजेरी लावत असतात. हे खेळाडूंवर असलेले प्रेम आहे, जे प्रेक्षकांना मैदानात खेचून आणते.
भारतातील प्रत्येक राज्यात स्टेडियम आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात येथे मोठे स्टेडियम आहेत. तसेच आता छोट्या शहरांमध्ये देखील स्टेडियम बनायला सुरुवात झाली आहे. जिथे आंतरराष्ट्रीय सामने देखील भरवले जात आहेत. काही स्टेडियम असे देखील आहेत, जे नव्याने बनवण्यात आले आहेत. ज्यामध्ये अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम आणि नागपूरच्या विदर्भ क्रिकेट ग्राउंडचा समावेश आहे.
तसेच, भारतात असे देखील काही स्टेडियम आहेत, ज्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर तिथे काही आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले. परंतु, आता या स्टेडियममध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात नाही. अशाच काही स्टेडियमबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
१) कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर –
हे तेच स्टेडियम आहे, ज्या स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमधील पहिले वहिले दुहेरी शतक झळकावले होते. हा सामना २०१० रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यानंतर आतापर्यंत या स्टेडियममध्ये एकही सामना झालेला नाहीये. आता या मैदानावरील सामने इंदोरच्या मैदानावर खेळवले जात आहेत. या स्टेडियमकडे आता दुर्लक्ष केले जात आहे.
२) किनन स्टेडियम, जमशेदपूर –
या स्टेडियमवर शेवटचा सामना २००६ रोजी भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत जोरदार विजय मिळवला होता. त्यानंतर आतापर्यंत या मैदानावर एकही सामना झालेला नाहीये. रांचीमध्ये स्टेडियम बनवण्यात आल्यापासून या स्टेडियमकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे.
३) बरखतूल्लाह खान स्टेडियम, जोधपूर –
या मैदानावर शेवटचा सामना होऊन १८ वर्ष उलटली आहेत. या मैदानावर शेवटचा सामना २००२ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन्ही संघांमध्ये झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत जोरदार विजय मिळवला होता. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमचे निर्माण झाल्यापासून या स्टेडियमचे महत्त्व कमी झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं
कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने
धक्कादायक!! शेन वॉर्नचा मोठा अपघात, १५ मीटर पेक्षा लांब घासत गेली बाईक; मुलगाही होता सोबत





