---Advertisement---

बांग्लादेश वि. वेस्ट इंडिज कसोटीदरम्यान ३ भारतीय नागरिकांना अटक, जाणून घ्या कारण

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 10:26 AM
---Advertisement---

चटगाव मध्ये वेस्ट इंडिज संघाने बांग्लादेश संघाला पहिल्या कसोटी सामन्यात मात दिली आहे. बांग्लादेश संघाने विंडीज संघासमोर ३९५ धावांचे आव्हान ठेवले होते. इतक्या मोठ्या धावांचे पाठलाग करत असताना वेस्ट इंडिज संघाचा पराजय निश्चित वाटत होता. परंतु, विडींजचा अष्टपैलू खेळाडू कायले मेयर्स याने दुहेरी शतक झळकावत विंडीजला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील काही लोकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली, ज्यामध्ये ३ भारतीयांचा समावेश होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असल्याचे समजत आहे. काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सट्टेबाज लोक सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये सट्टा लावत होते. हा प्रकार निदर्शनास येताच, पोलिसांना बोलवण्यात आले आणि दुपारी २.३० वाजता स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून त्यांना अटक करण्यात आली. सुनिल कुमार (Sunil Kumar), चेतन शर्मा (Chetan Sharma) आणि सनी मघु (Sunny Maghu) अशी त्या भारतीय व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये जुगार लावतानाचे व्हिडिओ सापडले आहेत.

पदार्पणच्या सामन्यात कायले मेयर्सची खास विक्रमाला गवसणी 

वेस्ट इंडिजचा पदार्पणवीर कायले मेयर्सने अतिशय प्रभावी प्रदर्शन केले. त्याने चौथ्या डावात फलंदाजी करताना ३१० चेंडूत २१० धावा काढल्या. ज्यात २० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. यासह पदार्पणाच्या सामन्यातील दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारा कायले मेयर्स हा जगातील एकमेव क्रिकेटपटू बनला आहे. याबरोबरच कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात आशियामध्ये द्विशतक करणारा फलंदाज बनला आहे. याआधी गॉर्डन ग्रीनिज याने विंडीज संघाला द्विशतक करून सामना जिंकवला होता. तर कायले मेयर्स हा कारनामा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG Test Live : चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात; वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विनची जोडी फलंदाजीसाठी मैदानावर

पहिल्या २ कसोटीत १२वा खेळाडू म्हणून खेळवले, पुढे संधी मिळताच ठोकले लागोपाठ ३ शतक

विराट कोहलीचा धावांचा दुष्काळ संपता संपेना, मागील १४ महिन्यांपासून केलं नाही एकही शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---