आयपीएल 2019 चा मोसम 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलचे वेध लागले आहेत. येत्या शनिवारपासून(23 मार्च) आयपीएलच्या या 12 व्या मोसमाला सुरुवात होत आहे.
आयपीएलने 12 वर्षात जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत असतात. पण या आयपीएलमध्ये असे काही कर्णधार आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले आहे. मात्र आयपीएलमध्ये ते अशस्वी ठरले आहेत.
असे हे तीन कर्णधार ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त कामगिरी केली आहे, पण आयपीएलमध्ये नेतृत्व करताना त्यांना अपयश आले आहे.
3. विराट कोहली – भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करतो. सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी असणाऱ्या विराटने आयपीएलमध्येही खोऱ्याने धावा केल्या आहेत. मात्र तो बेंगलोर संघाला एकदाही विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही.
तसेच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 94 सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील फक्त 44 सामन्यात त्याला विजय मिळवता आला आहे तर, 48 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
2. कुमार संगकारा – श्रीलंका संघाचा एक यशस्वी आणि दिग्गज कर्णधार असलेल्या कुमार संगकाराला मात्र आयपीएलमध्ये कमाल करता आली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने 2011 च्या विश्वचषकात अंतिम फेरीत धडकही मारली होती.
पण आयपीएमध्ये नेतृत्व करताना मात्र संगकाराला अपयश आले. त्याने आयपीएलमध्ये 46 सामन्यात नेतृत्व केले. परंतू यातील 16 सामन्यातच त्याला विजय मिळवता आला आणि 30 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
1. राहुल द्रविड – द वॉल अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडने भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तसेच त्याने भारताचे काही काळ नेतृत्व देखील केले होते. त्याचबरोबर द्रविड सध्या भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षणपदही यशस्वीपणे सांभाळत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने 2018 चा 19 वर्षांखालील विश्वचषकही जिंकला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढे यश मिळालेल्या द्रविडला मात्र आयपीएलमध्ये नेतृत्व करताना अपयश आले. त्याने आयपीएलमध्ये 48 सामन्यात नेतृत्व केले. पण त्याला त्यातील 22 सामनेच जिंकता आले तर 26 सामन्यात पराभूत व्हावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
–हे ५ खेळाडू चेन्नईला खऱ्या अर्थाने करु शकतात सुपर किंग
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–चौथ्या क्रमांकावर विश्वचषकात खेळणार हा खेळाडू