---Advertisement---

भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…

On: रविवार, जुलै 26, 2020 4:20 PM
---Advertisement---

एखाद्या खेळाडूसाठी त्याचा पहिला आणि शेवटचा सामना सर्वात खास असतो. प्रत्येक खेळाडूला आपल्या कारकिर्दीची सुरूवात दमदारपणे व्हावी असे वाटत असते तसेच कारकिर्दीचा शेवटही दमदार व्हावा अशी त्याची इच्छा असते.

निवृत्तीचा निर्णय घेणे कोणत्याही खेळाडूला सोपे नसते, परंतु तो आपला शेवटच्या सामन्यात उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. जसे कि, दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने २०१३ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात ११५ धावांची शानदार खेळी केली होती, आणि कसोटी क्रिकेटमधून विजयासह निवृत्ती घेतली होती.

त्याचप्रमाणे असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवटचा सामना भारता विरुद्ध खेळून केला आहे. या खेळाडूंमधील ३ दिग्गज खेळाडूंबद्दल या लेखात सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला होता.

भारताविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारे ३ दिग्गज क्रिकेटपटू – 

१. सर अ‍ॅलिस्टर कुक (अंतिम कसोटी सामना-२०१८, ओव्हल)

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २५७ सामने खेळले असून, त्यात त्याने १५,७३७ धावा केल्या आहेत. यात त्याने ३८ शतके आणि ७६ अर्धशतके झळकावली. अ‍ॅलिस्टर कुकची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावसंख्या २९४ धावा होती.

अ‍ॅलिस्टर कुकने २००९ मध्ये शेवटचा टी-२० सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध, तर २०१४ मध्ये शेवटचा वनडे श्रीलंकेविरुद्ध आणि २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळाला. भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेच्या शेवटच्या कसोटीनंतर कुक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. विशेष म्हणजे कूकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणही २००६ ला भारताविरुद्धच झाले होते.

२०१८ ला झालेल्या इंग्लंड-भारत कसोटी मालिकेतील पाचवा सामना द ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात ७१ आणि दुसऱ्या डावात १४७ धावांची शतकी खेळी करून अ‍ॅलिस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंडने हा सामना ११८ धावांनी जिंकला आणि या सामन्याचा मानकरी म्हणून कुकला सन्मानित केले.

२. कुमार संगकारा (अंतिम कसोटी सामना-२०१५, कोलंबो)

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण ५९४ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २८,०१६ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने ६३ शतकेही ठोकली असून त्याची सर्वाधिक धावसंख्या ३१९ अशी आहे. कुमार संगकाराने अखेरचा टी-२० सामना एप्रिल २०१४ मध्ये भारताविरुद्ध, तर मार्च २०१५ मध्ये शेवटचा वनडे सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला.

तसेच कुमार संगकाराने शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट २०१५ मध्ये कोलंबो येथे भारताविरुद्ध खेळला होता. या सामन्यात कुमार संगकाराने पहिल्या डावात ३२ धावा केल्या तर दुसऱ्या डावात १८ धावा केल्या. श्रीलंकेने हा सामना २७८ धावांनी गमावला. कुमार संगकाराचा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता.

१. अ‍ॅडम गिलख्रिस्ट (अंतिम वनडे सामना २००८, सिडनी)

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा एक उत्तम खेळाडू होता. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण ३९६ सामन्यांत १५,४६१ धावा केल्या आणि त्यात ३३ शतकेही केली. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अ‍ॅडम गिलख्रिस्टने सर्वाधिक २०४ धावा केल्या आहेत.

अ‍ॅडम गिलख्रिस्टने २००८ मध्ये टी-२०, वनडे आणि कसोटी कारकीर्दीचा शेवटचा सामना खेळला होता. गिलख्रिस्टने ह्या तिन्ही फॉर्मेटमधील शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला ही एक विशेष बाब आहे. अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या कारकीर्दीचा शेवटचा सामना मार्च २००८ मध्ये सिडनी येथे भारताविरुद्ध खेळला गेला होता. परंतु, या वनडे सामन्यात गिलख्रिस्टने केवळ २ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी सामना गमावला होता. या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश

‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू;  बाथरूममध्ये रडायचा तासंतास

काॅफीही नशीबात नाही, कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरने व्यक्त केली खंत

ट्रेंडिंग लेख-

वनडेत एका वर्षात सर्वाधिक शतके करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज; रोहित शर्मा आहे या क्रमांकावर

आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ मैदानांवर

आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---