सध्या सर्वत्र इंडियन प्रीमिअर लीग 2023ची धामधूम सुरू आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमीही आयपीएलचा आनंद लुटत आहे. मात्र, यामध्येच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मंगळवारी (दि. 25 एप्रिल) चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला. बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याला संधी मिळाली, तर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना संघातून वगळले. मात्र, या सर्व 15 खेळाडूंमध्ये किती आयपीएल संघांचे किती खेळाडू आहेत, याचा आढावा आपण या लेखातून घेऊयात…
डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा एकच खेळाडू आहे. तो म्हणजे, रोहित शर्मा. रोहित हा मुंबईचाही कर्णधार आहे आणि तो या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचीही धुरा सांभाळणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त गुजरात टायटन्स संघाचे एकूण 3 खेळाडू या संघात असून त्यात शुबमन गिल, केएस भरत आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details 🔽 #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023
मुंबई आणि गुजरातव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही दोन खेळाडू आहेत. त्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा समावेश आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्स संघाचेही दोन खेळाडू कसोटी संघात सामील आहेत. ते खेळाडू म्हणजेच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) होय. याव्यतिरिक्त लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही प्रत्येकी 2 खेळाडू आहेत. लखनऊचे केएल राहुल आणि जयदेव उनाडकट, तर कोलकाताचे शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचे अनुक्रमे आर अश्विन आणि अक्षर पटेल या खेळाडूंचाही कसोटी संघात समावेश आहे.
अशाप्रकारे भारताच्या 15 सदस्यीय संघात एकूण 8 आयपीएल संघांचे खेळाडू आहेत. त्यात गुजरात संघाचे सर्वाधिक 3 खेळाडू आहेत.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवणारे आयपीएल संघाचे खेळाडू
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा
गुजरात टायटन्स- शुबमन गिल, मोहम्मद शमी, केएस भरत
कोलकाता नाईट रायडर्स- शार्दुल ठाकूर, उमेश यादव
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- विराट कोहली, मोहम्मद सिराज
चेन्नई सुपर किंग्स- अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा
लखनऊ सुपर जायंट्स- केएल राहुल, जयदेव उनाडकट
राजस्थान रॉयल्स- आर अश्विन
दिल्ली कॅपिटल्स- अक्षर पटेल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुझ्या वडिलांसोबतही असंच झालेलं, तू…’, अर्जुनला ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचा सल्ला
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर चाहते भलतेच खुश; म्हणाले, ‘परमेश्वरा अपयश दे, पण…’