भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. या मालिकेत भारतीय संघाच्या 9 खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे ब्रिस्बेन येथे होणार्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला प्लेईंग इलेव्हन निवडताना अडचण येणार आहे. तिसर्या कसोटी सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हनुमा विहारी देखील चौथ्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
या दुखापतीमुळे त्याला केवळ ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामनाच नाही, तर फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेलाही मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघाला हनुमा विहारी याच्या जागी इंग्लंड विरुद्ध होणार्या कसोटी मालिकेत कोणत्या तरी दुसर्या खेळाडूला संधी द्यावी लागणार आहे. जेण्रूेन विहारी प्रमाणे भारतीय संघाच्या डावात मोलाचा वाटा उचलू शकेल. त्यामुळे आपण आज या लेखामधून विहारीच्या जागी कोणत्या तीन खेळाडूपैकी एकाचा विचार केला जावू शकतो, हे जाणून घेणार आहोत.
1. श्रेयस अय्यर
भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अजूनपर्यत कसोटी संघात पदार्पण केले नाही. परंतु, मर्यादीत षटकांत त्याने आपली कमाल दाखवली आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्ध होणार्या कसोटी मालिकेत आपल्या कसोटी कारकिर्दीची मुहूर्तमेढ उभारू शकतो.
श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 54 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 92 डावात फलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने 52.18 च्या सरासरीने 4592 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 12 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 202 आहे. त्यामुळे त्याला विहारीच्या जागी पदार्पण करण्याची संधी दिली जावू शकते.
2. मनिष पांडे
भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज मनिष पांडेचा विहारीच्या जागी विचार केला जावू शकतो. तो या जागेसाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अजून पदार्पण केले नाही. त्यामुळे त्याला या इंग्लंड विरुद्ध सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने मर्यादित षटकांतील सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
त्याचबरोबर त्याने कर्नाटक संघासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. त्याने 91 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 142 डावात त्याने फलंदाजी केली आहे. त्याने 51.11 च्या सरासरीने 5389 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 19 शतके आणि 29 अर्धशतके ठोकली आहेत. त्यामुळे मनिष पांडेला कसोटीत पदार्पण करण्याची संधी दिली जावू शकते.
3. अंकित बावणे
महाराष्ट्र संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करणारा स्टार फलंदाज अंकित बावणे भारतीय संघासाठी संकटमोचक ठरू शकतो. अंकित बावणे खूप वर्षापासून भारतीय संघात स्थान मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.
अंकित बावणे नेहमीच रणजी करंडकमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालताना दिसून आला आहे. त्याने महाराष्ट्र संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना 101 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 51.34 च्या सरासरीने 6675 धावा काढल्या आहेत. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये 19 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध होणार्या कसोटी सामन्यात त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या सामन्यात विल पुकोवस्कीच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली जावू शकते संधी, प्रशिक्षकांनी दिले संकेत
आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर रंगला भारत-पाकिस्तानचा सामना, पाहा कोणी मारली बाजी
गाबाच्या मैदानावर ‘यांचा’ दबदबा! ब्रिस्बेनवरील कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे तीन भारतीय गोलंदाज