---Advertisement---

IPL 2021: मुंबई इंडियन्सचे ३ असे खेळाडू, ज्यांना पूर्ण हंगाम बसून राहावं लागेल बाकावर

On: सोमवार, मार्च 1, 2021 2:43 PM
---Advertisement---

आयपीएलचे १४ वे सत्र येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच सर्व संघांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे. चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात सर्व संघांनी सर्वश्रेष्ठ खेळाडूंची निवड केली आहे. या लिलावात एकूण २९२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामधून ५७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यातील ८ खेळाडू आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले.

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स संघात भारतीय आणि परदेशी खेळाडू मिळून २५ श्रेयस्कर खेळाडू झाले आहेत. त्यामुळे या संघाच्या पहिल्या ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना धडपड करावी लागणार. अशातच असे ३ स्टार खेळाडू आहेत, ज्यांना या आयपीएल सत्रात मुंबई इंडियन्स संघाकडून एकही सामना खेळायला मिळू शकणार नाही.

१) क्रिस लीन : आयपीएल २०२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघातून मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केलेल्या क्रिस लीनला युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला आयपीएल २०२१ साठी मुंबई संघाने रिटेन केले आहे. परंतु यंदाही त्याचे पहिल्या ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे कठीण दिसून येत आहे. याचे कारण असे की, लीनला अजुनपर्यंत फॉर्म गवसला नाहीये. तसेच मुंबई इंडियन्स संघाकडे सलामीसाठी क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांसारखे फलंदाज आहेत. अशातच लीनला संघात स्थान मिळणे कठीण आहे.

२) सौरभ तिवारी : आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून मुंबई इंडियन्स संघाचे आणि सौरभ तिवारीचे वेगळेच नाते आहे. परंतु पहिल्या हंगामात केलेली कामगिरी पुन्हा करण्यात तो अपयशी ठरला आहे. त्याला अनेक सामन्यात संधी मिळाली. परंतु त्याला संधीचे सोने करता आले नाही. युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० च्या हंगामात ईशान किशन दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर सौरभ तिवारीला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला आपली छाप सोडण्यास अपयश आले होते. अशातच यंदाच्या हंगामात ईशान किशन हा चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. शिवाय हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या असताना सौरभ तिवारीला संघात स्थान मिळणे कठीण आहे.

३) धवल कुलकर्णी : धवल कुलकर्णीने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघाकडून केली होती. २००८ पासून ते २०१३ पर्यंत त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर त्याला दुसऱ्या संघातून खेळावे लागले होते. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात धवलला पुन्हा मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट होण्याची संधी मिळाली. परंतु यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यामुळे धवल कुलकर्णीला संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ भारतीय खेळाडूंनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाच्या अपेक्षा धूसर

एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे

क्रिकेटच्या मैदानानंतर बिग बॉसच्या घरात नशीब अजमावून पाहणारे ५ क्रिकेटपटू; एक तर आहे चक्क परदेशी खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---