---Advertisement---

असे ३ खेळाडू ज्यांना टी२० विश्वचषकांच्या सामन्यांत धोनी नक्की खेळवण्याचा प्रयत्न करेल

On: शनिवार, सप्टेंबर 11, 2021 11:23 PM
Virat Kohli and MS Dhoni.jpg
---Advertisement---

आयपीएलनंतर आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. ज्यात भारतीय संघ जिंकण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरेल. भारताने आपला १५ सदस्यीय संघही जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताला आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

यावेळी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या निवडीबरोबरच बीसीसीआयने एक चकीत करणारी घोषणा केली. यावेळी बीसीसीआयने सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून पाठवणार आहे. त्यामुळे, त्याच्यासोबत राहिल्याने संघाच्या मानसिकतेला फायदा होईल. पण, कर्णधार धोनी विश्वचषकच्या प्रत्येक सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही खेळाडूंना ठेवण्याचा नक्कीच सल्ला देऊ शकतो. असे कोण ३ खेळाडू आहेत, यावर एक नजर टाकू.

१. रिषभ पंत
युवा खेळाडू रिषभ पंत हा असा खेळाडू आहे, ज्यामुळे संघाला खूप फायदा होईल. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतही हे दिसून आले आहे. फलंदाजीत आणि यष्टीमागे दोन्ही ठिकाणी उपयुक्त ठरलेला रिषभ टी -२० विश्वचषकात भारतीय संघासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो. मोठे फटके मारण्यात माहिर असलेल्या पंतने आतापर्यंत ३३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५१२ धावा केल्या आहेत. तसेच २०२० मध्ये यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात त्याने चांगली फलंदाजी केली होती.

२.रवींद्र जडेजा
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अष्टपैलू रवींद्र जडेजाला प्रत्येक सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायला निश्चितपणे आवडेल. हा खेळाडू खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात संघासाठी कामगिरी करण्यात पटाईत आहे. जडेजाने आतापर्यंत त्याच्या ५० आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये २१७ धावा केल्या आहेत आणि ३९ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगल्या खेळ्या खेळल्या आहेत. स्वतः महेंद्रसिंग धोनी सीएसकेचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत धोनीला रवींद्र जडेजाच्या प्रत्येक प्रतिभेची चांगली जाणीव आहे

३. रविचंद्रन अश्विन
प्रतिभावान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला चार वर्षांनंतर प्रथमच टी२० संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी विकेट मिळवून देणारा गोलंदाज अशी ओळख अश्विनने बनवली आहे. तो नेहमी फलंदाजांना त्याच्या फिरकीने संकटात आणतो. तो आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्ससाठी सातत्याने विकेट घेत आला आहे. अश्विनने आतापर्यंत ४६ आंतरराष्ट्रीय टी -२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने आपल्या खात्यात ५२ विकेटसह १२३ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर ३ वेळा कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव, कुठे झाला निष्काळजीपणा?

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची मोठी ‘स्वप्नपूर्ती’; आई-वडिलांना पहिल्यांचा घडवला विमानप्रवास, पाहा फोटो

आयपीएलमुळे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय मालिकेला फटका; डीआरएसशिवाय खेळावे लागणार सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---