---Advertisement---

आयपीएलमुळे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय मालिकेला फटका; डीआरएसशिवाय खेळावे लागणार सामने

On: शनिवार, सप्टेंबर 11, 2021 10:16 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ १७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी आशियाई दौऱ्यावर आहे, जिथे त्यांनी शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेचा समारोप केला. बांगलादेश संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिल्यांदा मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आणि मालिकेत न्यूझीलंड संघाचा ३-२ असा पराभव केला. बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणार आहे, जिथे तो ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

तत्पुर्वी, १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे, जे लवकरच सोडवले नाही तर, दोन्ही संघांना निर्णय डीआरएस सिस्टमशिवाय संपूर्ण मालिका आयोजित करावी लागेल.

बीसीसीआयने आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या बहुतेक डीआरएस सिस्टम ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पाकिस्तान- न्यूझीलंड मालिकेसाठी पाकिस्तानला आयसीसी मान्यताप्राप्त ऑपरेटर शोधण्यात अडचण उभी राहिली आहे.

आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने, जे कोरोनामुळे मध्यंतरी थांबवले गेले होते, ते यूएईमध्ये आयोजित केले जात आहेत. ज्याचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पीसीबीच्या तुलनेत डीआरएस ऑपरेटर्सना ४ पटीने पैसे दिले आहेत आणि याच कारणामुळे ऑपरेटर्सनी या आंतरराष्ट्रीय मालिकेपेक्षा आयपीएलला प्राधान्य दिले आहे.

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले, “आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसी प्रमाणित डीआरएस ऑपरेटरचीच आवश्यकता असते आणि ही मालिका खेळली जात असताना कोणतेही ऑपरेटर उपलब्ध नाहीत. म्हणूनच पीसीबीला डीआरएसशिवाय मालिका आयोजित करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.”

त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वास व्यक्त केला आहे की मर्यादित षटकांच्या स्वरूपाच्या या मालिकेसाठी त्यांना निश्चितपणे डीआरएस सेवा मिळतील. आयसीसी टी -२० विश्वचषकानंतर पाकिस्तानने इंग्लंडला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी आमंत्रण दिले आहे. जाणकारांच्या मते, इंग्लंड मालिकेसाठीही डीआरएसचे पूर्व-बुकिंग पीसीबीसाठी सोपे नसेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

मँचेस्टर कसोटी रद्द होण्याचा आयपीएलशी संबंध, इंग्लिश मीडियाचे भारतीय खेळाडूंवर आरोप

आयपीएलवरही कोरोनाचे संकट; इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या या ६ खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर

आयपीएल जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला काय करावे लागेल? स्टीव स्मिथ म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---