---Advertisement---

आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर ३ वेळा कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव, कुठे झाला निष्काळजीपणा?

On: शनिवार, सप्टेंबर 11, 2021 11:07 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द झाला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बीसीसीआयने कोरोना दरम्यान यूएईमध्ये आयपीएलचे यशस्वी आयोजन केले. यामुळे जगातील इतर देशांना संदेश देण्यात आला आहे की, कोरोना दरम्यान क्रिकेट उत्तम व्यवस्थापन आणि बायो-बबल तयार करून होऊ शकते. मात्र, यानंतर बायो-बबल तीन वेळा मोडला गेला वा फ्लॉप ठरला आहे.

शेवटी, प्रत्येक वेळी काय होत आहे? यूएईमध्ये कोणते प्रोटोकॉल पाळले गेले आणि त्यानंतर भारतात तसेच इतर ठिकाणी कोठे निष्काळजीपणा होता का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

आयपीएल २०२० चे यशस्वी आयोजन
बीसीसीआयने यूकेच्या एका कंपनीला बायो-बबल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. यासाठी कंपनीने मनगटी घड्याळाचा अवलंब केला होता. प्रत्येक खेळाडूला हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताना मनगटाचे घड्याळ घालावे लागत असे.

या घड्याळाद्वारे खेळाडूचे निरीक्षण केले गेले. जर तो बायो-बबलच्या बाहेर गेला तर तसा सिग्नल कंट्रोल रूमला मिळे. यासह, त्याच्या संपर्कात कोण आले होते हे देखील माहित होत होते. खेळाडूंना दररोज आरोग्यविषयक माहिती द्यावी लागायची. यामध्ये खेळाडूंना दररोज सकाळी ऍपवर सर्व तपशील द्यावा लागत होता.

तीनवेळा बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव 
आयपीएलचा १४ वा हंगाम यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये खेळला गेला, खेळाडू आणि प्रशिक्षक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर २९ सामन्यांनंतर व्यत्यय आला. आयपीएल दरम्यान ४ खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांना संसर्ग झाला होता. सर्वप्रथम, केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर आणि चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादचे वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचे अमित मिश्रा यांनाही संसर्ग झाला. त्यानंतर आयपीएल स्थगित करावे लागले.

वास्तविक, आयपीएल भारतात होत असताना चेन्नईच्या कंपनीने खेळाडूंना ट्रॅकिंग डिव्हाइस दिले होते. हे उपकरण खराब असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे खेळाडूंचा माग काढता आला नाही. फ्रँचायझीने याबाबत बोर्डाकडे तक्रारही केली होती. एका संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की ते एका शहरातून दुसऱ्या शहरात गेले, परंतु जेव्हा डिव्हाइसवरील डेटा आला तेव्हा त्यात आधीच्या शहराची माहिती होती.

भारतातील आयपीएलमध्ये बायो-बबल अयशस्वी होण्याचे, एक कारण कोरोना अधिकाऱ्यांचे कामकाज होते. यूएईमध्ये प्रथमच बायो-बबल दरम्यान प्रत्येक संघासोबत १ कोरोना अधिकारी नियुक्त करण्यात आला होता, परंतु भारतात आयोजित आयपीएल दरम्यान, कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी चार कोरोना अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यानंतरही ते मंडळाला योग्य अहवाल देऊ शकले नाही. यामुळे, कोरोना संसर्ग वेळेत थांबवता आला नाही.

यावर्षी जुलैमध्ये भारतीय संघाचा खेळाडू कृणाल पंड्याला श्रीलंका दौऱ्यादरम्यान कोरोनाची लागण झाली होती. सात खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले होते. या मालिकेनंतर कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा उघड झाला होता.

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, फिजिओ नितीन पटेल, योगेश परमार यांना इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संसर्ग झाला. यामुळे शेवटची कसोटी रद्द करावी लागली. त्याचबरोबर मालिका सुरू होण्यापूर्वी रिषभ पंतलाही संसर्ग झाला. या दौऱ्यातही कोरोना प्रोटोकॉलचे योग्य प्रकारे पालन न केल्याबद्दल चर्चा झाली.

मालिका सुरू होण्यापूर्वी अनेक खेळाडू मास्कविना युरो कप फायनल आणि विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी गेले होते. त्याच वेळी, हॉटेलमध्ये बायो-बबल तयार नव्हते. मालिके दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची मोठी ‘स्वप्नपूर्ती’; आई-वडिलांना पहिल्यांचा घडवला विमानप्रवास, पाहा फोटो

आयपीएलमुळे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय मालिकेला फटका; डीआरएसशिवाय खेळावे लागणार सामने

मँचेस्टर कसोटी रद्द होण्याचा आयपीएलशी संबंध, इंग्लिश मीडियाचे भारतीय खेळाडूंवर आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---