---Advertisement---

आयपीएल २०२१: चेन्नई संघात दुखापतग्रस्त फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ क्रिकेटर

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. त्याने चेन्नईसाठी या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ७ सामन्यांमध्ये ६४ च्या सरासरीने ३२० धावा केल्या आहेत. तसेच युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडसह त्याची चांगली सलामीची जोडी तयार झाली आहे.

पण, दुखापतीमुळे यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी त्याच्या उपलब्धतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि चेन्नईसाठी हा नक्कीच मोठा धक्का असेल. तसे, संघात फाफ डू प्लेसिसऐवजी खेळण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत, ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

रॉबिन उथप्पा
रॉबिन उथप्पा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. हा अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतो. आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी उथप्पाला राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्जमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे परंतु त्याला अद्याप संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. म्हणून त्याच्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकते.

यावर्षी विजय हजारे करंडकात उथप्पा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. युवा गायकवाडच्या प्रभावी फलंदाजीने उथप्पाला आतापर्यंत प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवले होते, त्यामुळे उथप्पा नक्कीच संधीला पात्र आहे. उथप्पाने १८९ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १३० च्या प्रभावी स्ट्राईक रेटसह ४६०९ धावा केल्या आहेत.

एन जगदीसन
तामिळनाडूचा फलंदाज एन जगदीसन बराच काळ चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत आहे आणि आतापर्यंत त्याला चेन्नईसाठी फक्त ५ सामने खेळायला मिळाले आहेत. त्याने आतापर्यंत फक्त दोन डाव खेळले आहेत, ज्यात त्याने एकामध्ये शून्य आणि दुसऱ्यामध्ये ३३ धावा केल्या आहेत. त्यानंतर त्याला संधी देण्यात आलेली नाही.

यष्टीरक्षक फलंदाज जगदीसन या वर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने आपल्या राज्यासाठी सलामीला फलंदाजी केली आणि टीएनपीएलमध्ये सातत्यपूर्ण त्याने केली आहे. अशा परिस्थितीत, सीएसकेकडून त्याला जखमी फाफ डू प्लेसिसच्या जागी पुरेशी संधी मिळू शकते.

मोईन अली
मोईन अली या क्षणी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक बनला आहे. अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावली होती, त्यानंतर चेन्नईने त्याला आपल्या संघात घेण्यात यश मिळवले. फाफ डू प्लेसिससाठी वरच्या फळीत मोईन हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्यात अलीने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. तो योग्य वेळी बळी घेण्यास सक्षम आहे, तसेच तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना चमकदार खेळीही करू शकतो. तो याआधीही सलामीला खेळला आहे आणि त्याला सलामीला येण्यासही आवडते. तो सलामीसाठी सीएसकेला चांगला पर्याय ठरू शकतो, तसेच रैना तिसऱ्या क्रमांकावर परत खेळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

पैसा पैसा पैसा…!! ‘हे’ १० जण आहेत भारताचे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, लाखो नव्हे कोट्यावधींत करतात उलाढाल

आयपीएलच्या थरारासाठी आरोग्य विभागही सज्ज, असे असणार नवे नियम

ऑस्ट्रेलियाची एलिसा हेलीही आहे ‘हिटमॅन’ची जबरा फॅन; म्हणाली, ‘त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---