आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धा आता काही दिवसातच संपणार आहे. या हंगामात काही नव्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधुन घेतलं. वैभव सूर्यवंशी (Vaibhav suryanvanshi) आणि आयुष्य म्हात्रे (Ayush Mhatre) सारख्या खेळाडूंनी कमालीचे प्रदर्शन केलं आहे. या खेळाडूने त्यांच्या फ्रेंचाईचा विश्वास जिंकलेला आहे. तसेच या यादीमध्ये असे 3 खेळाडू आहेत, ज्यांना फ्रेंचाईजी अलविदा म्हणू शकते. या तीनही खेळाडूंनी त्यांच्या संघाला निराश केले आहे.
या यादीमध्ये पहिलं नाव रिषभ पंतचं (Rishbh Pant) आहे, ज्याला लखनऊने 27 करोड रुपयांना खरेदी केलं होतं, परंतु त्याने संघासाठी कोणतीही प्रभावी कामगिरी केली नाही. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होत आहेत की, 2026 आयपीएल हंगामासाठी त्याला फ्रेंचाईजी रिलीज करू शकते. तसेच या यादीत दुसरं नाव हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं (mohmmad shami) आहे. शमी सुद्धा हैदराबादच्या आशांवर खरा उतरला नाही. पूर्ण हंगामात शमीला विकेट घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत.
याशिवाय त्याने खूप धावा लुटवल्या देखील आहेत. या कारणाने हैदराबाद पुढच्या हंगामात त्याला संघातून भेदखल करू शकते.
तसेच या यादीमध्ये शेवटचं नाव आर अश्विनच (R Ashwin) आहे. अश्विनने देखील कमालीची कामगिरी केली नाही. फलंदाजी सोबतच गोलंदाजीमध्ये सुद्धा या अनुभवी खेळाडूने काही प्रभावी कामगिरी केली नाही.
पंतने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यात 13.73 च्या खराब सरासरीने 151 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटने केवळ 1 अर्धशतक झळकले आहे. तसेच शमीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात केवळ 6 विकेट घेतलेल्या आहेत. त्याने 11.23 च्या इकॉनोमीसोबत 337 धावा लुटवल्या आहेत. याशिवाय अश्विनने 9 सामन्यांत फक्त 7 फलंदाजांना बाद केले आहे. तसेच फलंदाजीमध्ये देखील त्याने 33 धावा केल्या आहेत. त्यामुळे तीनही खेळाडूंना पुढच्या हंगामात झटका बसण्याची शक्यता आहे.






