वय ही केवळ खेळातील संख्या नाही हे खेळाडूंपेक्षा चांगले कोणीही जाणू शकत नाही. खेळाडू 20व्या वर्षात खेळण्यास सुरूवात करतात. आणि वयाच्या 35-40 दरम्यान निवृत्ती जाहीर करतात. या दरम्यान काही खेळाडू अशी कामगिरी करतात ज्यामुळे ते दीर्घकाळ चाहत्यांच्या लक्षात राहतात. पण प्रत्येकालाच लवकर सुरुवात करण्याची संधी मिळत नाही.
असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपले तारुण्य देशांतर्गत क्रिकेट खेळण्यात घालवले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा प्रवास उशिरा सुरू झाला. मात्र, याचा त्यांच्या कामगिरीवर काही फरक पडला नाही आणि त्यांनी देशासाठी आपले सर्वोत्तम योगदान दिले. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिराने पदार्पण केले, आणि इतिहास रचत आपली छापही सोडली, जे लोकं नेहमी लक्षात ठेवतील.
3 – सईद अजमल
पाकिस्तानचा आघाडीचा फिरकी गोलंदाज सईद अजमल (Saeed Ajmal) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिराने पर्दापण केले. वयाच्या 32 व्या वर्षी त्याने पहिला कसोटी सामना खेळला होता. अजमलने एकामागून एक चमकदार कामगिरी केली आणि आधुनिक युगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक बनला. त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये बरेच मिश्रण तयार केले होते जे फलंदाजांसाठी एक मोठी समस्या बनले होते.
पाकिस्तानच्या या फिरकीपटूला एकाच लाईनमधून ऑफ आणि लेग स्पिन करणं पाहणे हा खूप आनंददायी अनुभव होता. त्याच्या
गोलंदाजीतील मिश्रणामुळे फलंदाजाला चेंडू समजण्यात खूप अडचणी येत. अजमल आपली सर्वोत्तम कामगिरी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी कर्दनकाळ बनला होता.
2 – एडम वोग्स
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज एडम वोग्स (Adam Voges) याला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. वयाच्या 28 व्या वर्षी त्याने देशासाठी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या 35 व्या वर्षी, वोग्स कसोटी इतिहासात पदार्पणात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 130 धावांची खेळी खेळली होती. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित सदस्य बनला.
1 – माइकल हसी
‘मिस्टर क्रिकेट’ ही पदवी मिळवलेल्या माइकल हसी (Michael Hussey) याला परिचयाची गरज नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी हसीला जवळपास दशकभर वाट पाहावी लागली. हसीने वयाच्या 28 व्या वर्षी वनडे आणि वयाच्या 30 व्या वर्षी कसोटीत पदार्पण केले. कसोटी क्रिकेटमध्ये दोन वर्षानंतर त्याची सरासरी 86.18 पर्यंत गेली होती.
हसी सर्वात जलद 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 164 दिवसांत ही कामगिरी केली आणि 2006 मध्ये आयसीसी वन-डे ‘प्लेयर ऑफ द इयर’चा किताब पटकावला होता. 2010 च्या टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत त्याने हे सिद्ध केले की तो खेळाच्या प्रत्येक प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करू शकतो. (3 players made cricket famous by making their international debut in thirties)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका भिडणार, जाणून घ्या खास आकडेवारी आणि पिच रिपोर्ट
मोठी बातमी: विश्वचषकादरम्यानच भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला टाटा-बायबाय, आता दिसणार नाही…