---Advertisement---

3 युवा खेळाडू ज्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली, भारताच्या कसोटी संघात मिळू शकते जागा

On: सोमवार, सप्टेंबर 23, 2024 7:42 AM
---Advertisement---

दुलीप ट्रॉफीचा तिसरा हंगाम संपला आहे. मयंक अग्रवालच्या इंडिया ए संघानं ऋतुराज गायकवाडच्या संघाचा 132 धावांनी पराभव करत दुलीप करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं. देशांतर्गत क्रिकेटमधील या खेळाडूंच्या कामगिरीमुळे त्यांच्यासाठी टीम इंडियाचा मार्ग खुला होऊ शकतो.

आपण या बातमीत अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी या देशांतर्गत हंगामात चमकदार कामगिरी करून निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे असे खेळाडू आहेत, ज्यांना टीम इंडियाचं भविष्य म्हणता येईल. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, या सगळ्यात त्यांनी आपली कला दाखवली.

(3) अभिमन्यू ईश्वरन – अभिमन्यू ईश्वरनची टीम इंडियात याआधीही निवड झाली आहे, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. डेहराडूनच्या या 26 वर्षीय फलंदाजानं आपली फलंदाजी क्षमता सर्वांना दाखवून दिली आहे. इंडिया बी संघाचा कर्णधार म्हणून त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. या मोसमात त्यानं 3 सामन्यात 309 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील त्याचं टायमिंग आणि शॉट सिलेक्शन पाहण्यासारखं होते. तो एक असा खेळाडू आहे, ज्याच्याकडे नेतृत्वगुणही आहेत.

(2) रिकी भुई – श्रेयस अय्यरच्या संघाकडून खेळणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाज रिकी भुईनं संघाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावली. त्यानं दोन्ही डावात 56 आणि 119 धावा केल्या. याशिवाय तो या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यानं एकूण 359 धावा केल्या. रिकीनं त्याच्याकडे मधल्या फळीत डाव सांभाळण्याची पूर्ण क्षमता असल्याचं दाखवून दिलं. अशा परिस्थितीत तो आगामी काळात टीम इंडियाचा स्टार खेळाडू बनू शकतो. भुईकडे वेगानं फलंदाजी करण्याची क्षमताही आहे, ज्यामुळे त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये संधी मिळू शकते.

(1) अर्शदीप सिंग – टीम इंडियासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकटमध्ये आपलं स्थान पक्कं करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानं इंडिया डी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीपनं पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. टी20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्शदीपची क्षमता संपूर्ण जगानं पाहिली आहे. आता तो लाल चेंडूनंही कहर करू शकतो. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियात स्थान मिळू शकतं.

हेही वाचा – 

संघ हरला पण पठ्ठ्याने मन जिंकलं! साई सुदर्शनने झुंजार शतक करत टीम इंडियासाठी ठोकला दावा
“कोणाला किती धावा करायच्या…” रोहिबाबत पंतने केला मोठा खुलासा
“हा देवाचा आशीर्वाद असावा”, पंतच्या तुफानी शतकी खेळीवर अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---