बीसीसीआयनं राहुल द्रविड यांच्या नंतर गौतम गंभीरची भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर आता टीम इंडिया आणि चाहत्यांची नजर बाकी कोचिंग स्टाफवर लागली आहे.
गोलंदाजी प्रशिक्षकाबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत अनेक नावे समोर आली आहेत. यामध्ये दोन माजी भारतीय खेळाडू झहीर खान आणि विनय कुमार यांची नावं आघाडीवर आहेत. गौतम गंभीर यानं दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल याचं नाव सुचवलं आहे. या तिघांपैकी कोण भारतीय संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतो, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.
विनय कुमार – गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षकासाठी विनय कुमारचं नाव सर्वप्रथम समोर आलं. कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा विनय कुमार आयपीएलमध्ये अनेक संघांचा भाग राहिला आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स कडूनही खेळला होता. त्यामुळे गौतम गंभीरसोबत त्याचं नातं उत्कृष्ट मानलं जातं. गोलंदाजी प्रशिक्षकासाठी गंभीरनंच त्याचं नाव सुचवलं होतं. मात्र बीसीसीआयनं अद्याप या नावाचा विचार केलेला नाही.
झहीर खान – टीम इंडियाचा विश्वचषक विजेता खेळाडू झहीर खान देखील या शर्यतीत आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयनं विनय कुमारनंतर या पदासाठी झहीर खानचं नाव पुढे केलं. परंतु गौतम गंभीरच्या बाजूनं अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय आणि गौतम गंभीरमध्ये झहीर खानच्या नावावरून मतभेद आहेत, असं बोललं जातंय.
मोर्ने मॉर्केल – आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा मोर्ने मॉर्केलही या शर्यतीत पुढे आला आहे. रिपोर्ट्सनुसार, गंभीरनं स्वतः मॉर्केलच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. मोर्ने मॉर्केलला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजीचा भरपूर अनुभव आहे. शिवाय त्यानं पाकिस्तान आणि नामिबियासारख्या संघांचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
3 असे खेळाडू, ज्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज
IPL 2025: द्रविड नाही, गौतम गंभीरचा मित्र बनणार केकेआरचा नवा मार्गदर्शक!