सध्याच्या भारतीय क्रिकेट संघावर एक नजर टाकली, तर बहुतेक सर्वच खेळाडूंची लग्न झाली आहेत. एकेकाळी युवराज सिंग, एमएस धोनी, सुरेश रैना या भारतीय खेळाडूंची महिला चाहत्यांमध्ये खूप चर्चा होत असायची. आताही संघात असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर महिला चाहते जीव ओवाळून टाकतात. गेल्यावर्षी मनीष पांडे, हनुमा विहारी विवाहबंधनात अडकले.
२०२०मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातील विराट कोहली, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, वृद्धीमान सहा, उमेश यादव, मोहम्मद शमी व इशांत शर्मा हे आधीच विवाहबद्ध झालेले आहेत.
तर शुभमन गिल, पृथ्वी शाॅ, रिषभ पंत व जसप्रीत बुमराह हे नक्कीच सध्या लग्नाचा विचार करत नसणार.
आता सध्याच्या संघाचा विचार केला, तर काही खेळाडू असे आहेत ज्यांचे लग्न २०२० मध्ये होऊ शकते.
जाणून घेऊयात या २ खेळाडूंबद्दल जे २०२० मध्ये करू शकतात लग्न- 2 Players who can get Married in 2020
१. युजवेंद्र चहल
भारतीय क्रिकेट संघाचा २९ वर्षीय फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलही (Yuzvendra Chahal) लग्नाच्या बेडीत अडकू शकतो. चहल अजूनपर्यंत तरी कोणाला डेट करत नाही किंवा तसे वृत्त माध्यमांत नाही. चहलचे त्या यादीत नाव आहे जे २०२० मध्ये लग्न करू शकतात.
चहल समाजमाध्यमांवर सतत सक्रिय असतो. अलीकडेच त्याने कोणत्या प्रकारच्या मुलीसोबत लग्न करायला आवडेल, हे सांगून लग्नाचे संकेत दिले आहेत.
भारताला चहलने गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयसीसी टी२० विश्वचषकासाठी चहलचे भारतीय संघातील स्थान पक्के आहे. संघाला विजेतेपद मिळवून देण्यात चहल महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.
२. केएल राहुल
सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) मागील काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतासाठी मर्यादित षटकांच्या सामन्यात विजयी खेळी केल्या आहेत. राहुल सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला (Athiya Shetty) डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
राहुलला वेळ मिळतो, तेव्हा तो अथियासोबत वेळ घालवतो. नवीन वर्षाचे स्वागतही दोघांनी एकत्रित केले, दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली नाही. उलट समाज माध्यमांवर पोस्ट करून सर्वांना माहिती दिली. पण दोघांनीही अजूनपर्यंत ते रिलेशनशीपमध्ये आहेत हे कबूल केले नाही. राहुल २०२० मध्ये आपल्या जीवनातील नवीन इनिंगला सुरुवात करू शकतो.
याचबरोबर हार्दिक पंड्याबद्दल मात्र कोणतेही खात्रीशीर वृत्त नाही. माध्यमांतील काही वृत्तांनुसार त्याने लाॅकडाऊनमध्ये लग्न केले आहे तर काही वृत्तांनुसार तो अजून अविवाहित आहे. परंतु तो लवकरच बाप होणार असल्याचे त्याने पाठीमागेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
ट्रेंडिंग लेख-
-स्वत:च्या देशाबाहेरही चाहत्यांचे प्रेम मिळवणारे १० क्रिकेटपटू
-टीम इंडियाचे ‘हे’ २ फलंदाज, ज्यांच्या नावावर आहे गोलंदाजीतील आश्चर्यकारक विक्रम
-टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज