आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या मोसमांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने एकदाच विजेतेपद मिळवले आहे. आयपीएल २०२१ च्या हंगामाची सुरुवात पण संघाची चांगली झाली नाही. राजस्थानच्या संघातील काही महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच जोफ्रा आर्चरला दुखापत झाली आणि काही सामन्यांसाठी तो संघाच्या बाहेर पडला. त्यातच पहिल्या सामन्यातही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर आता त्यांच्या संघातील अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सदेखील आयपीएल २०२१मधून बाहेर पडला.
राजस्थानचा पहिला सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध झाला. त्या सामन्यात स्टोक्सला ख्रिस गेलचा झेल घेताना दुखापत झाली. याच कारणामुळे त्याला आयपीएल २०२१ हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. तो त्यांच्या संघातील एक अनुभवी खेळाडू होता. त्यामुळे संघाला उर्वरित हंगामात त्याची कमतरता जाणवेल. कारण तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये संघाचा समतोल राखण्यात महत्त्वाचा वाटा उचलतो.
पण आता तो बाहेर पडल्याने त्याच्या ऐवजी कोणत्या तीन खेळाडूंपैकी एकाला राजस्थान संधी देऊ शकतात याबद्दल आपण आढावा घेऊया.
ऍरॉन फिंच
ऍरॉन फिंचला आयपीएल २०२१ लिलावामध्ये एकाही संघाने विकत घेतले नाही. फिंच हा ऑस्ट्रेलियाच्या टी२० आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. तसेच त्याच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. एवढेच नाही तर त्याला आयपीएलमध्येही खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये ८७ सामने खेळले असून २००५ धावाही केल्या आहेत. त्यामुळे राजस्थान उर्वरित आयपीएल हंगामासाठी स्टोक्स ऐवजी फिंचशी करार करु शकतात.
ऍलेक्स हेल्स
इंग्लंडचा फलंदाज ऍलेक्स हेल्स हा पण राजस्थान संघाचा भाग बानू शकतो. तो गेल्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये पण आहे. ऍलेक्स टी२० संघातील सर्वात वेगवान फलंदाजांपैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षीच्या बिग बॅश लीगमधील सर्वात जास्त धावा करणाऱ्यांमध्येही त्याचा समावेश होता. त्याने 15 सामन्यात 38.78 च्या सरासरीने आणि 161.60 च्या स्ट्राइक रेटने 543 धावा केल्या. तसेच तो इंग्लंडच्या कोणत्याही संघात सध्या नसल्यामुळे राजस्थान संघासाठी पूर्णवेळ उपलब्ध राहू शकतो.
थिसारा परेरा
श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या थिसारा परेराच्या समावेशामुळे राजस्थान रॉयल्स संघात समतोल साधला जाऊ शकतो. तो फलंदाजांच्य़ा फळीला मजबूती देऊ शकतो तसेच परेरा उत्तम गोलंदाजी करत असल्यामुळे संघाला त्याच्या गोलंदाजीचीही मदत होईल. परेराने नुकतेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये ६ चेंडूंमध्ये ६ सिक्स मारले होते. त्यामुळे तो उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे पण दिसून आले आहे. तो राजस्थानकडून फिनिशरची भूमिका बजावू शकतो आणि सोबतच महत्त्वपूर्ण बळी पण घेऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटची वनडे क्रमवारीतील १२५८ दिवसांची बादशाहत संपली, ‘हा’ फलंदाज आला पहिल्या क्रमांकावर
धक्कादायक! माजी कर्णधार हिथ स्ट्रिकवर आयसीसीने घातली तब्बल ८ वर्षांची बंदी, लावण्यात आले ‘हे’ ५ आरोप