यंदाचे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी अतिशय संस्मरणीय ठरले. कारण या वर्षी भारतीय संघाने आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) जिंकला. भारताने या संपूर्ण वर्षात भरपूर क्रिकेट खेळले. ज्यामध्ये अनेक कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या समावेश आहे. पण 2024 मध्ये भारताला जास्त वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघासाठी या वर्षी वनडेमध्ये मोजक्याच वनडे मालिका होत्या.
भारताने या वर्षी फक्त काही वनडे सामने खेळले, ज्यामध्ये स्टार यष्टीरक्षक फलंदाज ‘संजू सॅमसन’लाही (Sanju Samson) वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्या वनडे सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने यंदा एका डावात भारतासाठी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारताच्या त्या 3 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया. ज्यांनी यावर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ‘रोहित शर्मा’साठी (Rohit Sharma) मागील काही काळ खूप वाईट गेला आहे. त्यामध्ये तो सतत फ्लॉप शोचा सामना करत आहे. पण भारतासाठी रोहितने यावर्षी वनडेत चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंका दौऱ्यात त्याने शानदार फलंदाजी केली. या वर्षी खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमध्ये 52.33च्या सरासरीने 157 धावा करून तो भारतासाठी सर्वाधिक वनडे धावा करणारा खेळाडू बनला.
संजू सॅमसन- भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ‘संजू सॅमसन’च्या (Sanju Samson) कारकिर्दीला 2024 हे वर्ष वेगळी दिशा देणारे ठरले. यावर्षी त्याने भारताच्या जर्सीमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने केवळ टी20 मध्ये धावा केल्या नाहीत, तर या वर्षी त्याला फक्त 1 वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्याने शानदार शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एका सामन्यात त्याने 108 धावा केल्या.
अक्षर पटेल- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ‘अक्षर पटेल’साठी (Axar Patel) 2024 हे वर्ष चांगले ठरले. टी20 विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावण्याव्यतिरिक्त, अक्षरला काही वनडे सामने खेळण्याची संधी देखील मिळाली, दरम्यान त्याने यावर्षी भारतासाठी 4 वनडे सामने खेळले. यामध्ये अक्षरने 20च्या सरासरीने 80 धावा केल्या आणि तो भारतासाठी तिसऱ्या स्थानी राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs SA; मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची मजबूत कामगिरी, आफ्रिकेला नमवले
IND VS AUS; शेवटच्या दोन कसोटींसाठी संघाची घोषणा, 19 वर्षीय खेळाडूला संधी
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का, या मुख्य स्पर्धेत खेळणार नाही हार्दिक पांड्या, मोठे कारण समोर