आयपीएलमध्ये शुक्रवारी (2 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरा यझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्सचा 7 धावांनी पराभव केला. चेन्नईचा या हंगामातील हा सलग तिसरा पराभव होता.
या सामन्यात चेन्नई संघाने बऱ्याच चुका केल्या. यामुळेच चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. या लेखात आपण चेन्नईच्या पराभवाला जबाबदार असलेले 3 कारण पाहणार आहोत.
प्रियम गर्गला करू शकले नाही बाद
जेव्हा हैदराबादच्या चार विकेट लवकर पडल्या तेव्हा युवा प्रतिभावान फलंदाज प्रियम गर्ग फलंदाजीसाठी आला.त्यावेळी चेन्नईला सामन्यावर पकड मजबूत करण्याची पूर्ण संधी होती; पण प्रियांम गर्गने उत्कृष्ट फलंदाजी करत 23 चेंडूंत अर्धशतक केले. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने 160 च्या वर धावा केल्या.
सॅम करनने केली खराब गोलंदाजी
चेन्नईचा वेगवान गोलंदाज सॅम करन याने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना निराश केले. त्याने 3 षटकांत 37 धावा दिल्या. त्याने एकाच षटकात 22 धावा दिल्या. हैदराबादच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारले आणि संघाला सन्माननीय धावसंख्या मिळवून दिली.
सलामीवीर झाले फ्लॉप
वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूंवर संघाची अधिक जबाबदारी असते. चेन्नईचे वरच्या क्रमांकावर आलेले चार फलंदाज अवघ्या 34 धावांवर बाद झाले. अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी तळातील फलंदाजांवर होती. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि कर्णधार एमएस धोनीने सर्वोत्तम प्रयत्न केले पण शेवटी 7 धावा कमी पडल्या आणि संघाचा पराभव झाला.