भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. परंतु या सामन्यात भारताची स्थिती खूपच वाईट आहे. ऑस्ट्रेलियाच्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 100 धावांपूर्वीच 5 विकेट गमावल्या होत्या. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताचे दोन महान फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अजिबात फलंदाजी केली नाही. हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले. विराट कोहलीला 3 तर कर्णधार रोहित शर्माला केवळ 10 धावा करता आल्या. अशा स्थितीत त्यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा का असू शकतो या मागची तीन मोठी कारणे
3.वयाचा प्रभाव
रोही शर्मा आणि विराट कोहली यांचे वय झाले आहे. विराट कोहली 36 आणि रोहित शर्मा 37 वर्षांचा आहे. अशा स्थितीत भारतीय संघ पुढच्या वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल तोपर्यंत दोघांचे वय 40 च्या आसपास असेल. या कारणास्तव, पुढील वेळी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी या दोन खेळाडूंची निवड होईल, अशी आशा कमी आहे. त्यांच्याऐवजी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे ही मालिका विराट आणि रोहितची ऑस्ट्रेलियातील शेवटची कसोटी मालिका ठरू शकते. असे दिसते आहे.
2. दोन्ही फलंदाजांचा खराब फॉर्म
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आता पूर्वीसारखी फलंदाजी करायला अपयशी ठरत आहेत. जर आपण रोहित शर्माबद्दल बोलायचे तर तो गेल्या 13 डावांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावू शकला आहे. गेल्या पाच डावांत त्याला 20 धावांचा पल्लाही गाठता आलेला नाही. तर विराट कोहलीने पर्थ कसोटीत नक्कीच शतक झळकावले होते. पण तेव्हापासून तो सतत फ्लॉप होत आहे. अशा परिस्थितीत खराब फॉर्मचा त्याच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो.
1.कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो
विराट कोहली आणि रोहित शर्माचा फॉर्म असाच सुरू राहिला तर हे दोन्ही खेळाडू लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात. आता त्याची कसोटी कारकीर्द फार काळ टिकणार नाही आणि त्यामुळेच युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी हा खेळाडू निवृत्ती घेऊ शकतो. या कारणास्तव आता त्यांना पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणे कठीण झाले आहे.
हेही वाचा-
IND vs AUS: हा फलंदाज आशियाबाहेर सतत अपयशी, ऑस्ट्रेलियातही फ्लाॅप कामगिरी
गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज रुग्णालयात दाखल
कसोटी फाॅरमॅटमध्ये वेस्ट इंडिजला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक..! बोर्डाने केली घोषणा