आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटची सुरुवात २००५ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत १०८४ सामने खेळले गेले आहेत. आयसीसीच्या सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयानंतर बरेचसे संघ त्यांच्याशी जोडले गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० खेळणाऱ्या संघांची संख्या आतापर्यंत ७३ एवढी झाली आहे.
जर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक विजयांबद्दल बोलायचं झालं, तर हा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २०१६-१७ ला लागोपाठ ११ सामने आणि २०१८-१९ हंगामात १२ सामन्यांत विजय मिळवून विश्वविक्रम केला आहे.
याव्यतिरिक्त पाकिस्ताननेही लागोपाठ ९ विजय मिळविले आहेत. ज्याप्रमाणे संघांनी लागोपाठ विजय मिळवण्याचा विक्रम केले आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच संघांनी लागोपाठ पराभूत होण्याचाही विक्रम केला आहे.
आज आपण या लेखात त्या ३ संघांविषयी पाहणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा लागोपाठ पराभूत होण्याचा विक्रम केला आहे.
झिम्बाब्वे (१६ आणि ११)
२०१० ते २०१३ या दरम्यान झिम्बाब्वेला लागोपाठ १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवाचा सिलसिला २०१० टी२० पासून श्रीलंकेविरुद्ध सुरू झाला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१० मध्ये प्रत्येकी २ सामन्यांत पराभव झाल्यानंतर २०११ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २ आणि २०११-१२ मध्ये न्यूझीलंडकडून लागोपाठ ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
तर २०१२ मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांनीही झिम्बाब्वेला पराभूत केले आहे. त्यानंतर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजकडून २ सामन्यात पराभूत होऊन, २०१६-१९ या दरम्यान त्यांना ११ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता. २०१६ मध्ये भारताविरुद्ध २ सामन्यांची मालिका पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तानकडून २, तर त्रिकोणीय मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानकडून प्रत्येकी २ आणि त्यानंतर आफ्रिकेनेही २ सामन्यांत पराभूत केलं. आणि २०१९ मध्ये नेदरलँडकडूनही १ सामन्यांत त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.
बांगलादेश (१२)
२००७-२०१० या दरम्यान बांगलादेशला लागोपाठ १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. काही काळापूर्वी लागोपाठ जास्त सामने पराभूत होण्याचा विक्रम बांगलादेशच्या नावावर होता.
२००७ टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्याकडून लागोपाठ ४ सामन्यांच्या पराभवानंतर पुन्हा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांना पराभूत केलं. २००९ टी२० विश्वचषकात भारत आणि आयर्लंडने त्यांना पराभूत केलं. त्यानंतर वेस्ट इंडिजकडून १ सामना पराभूत होऊन, २०१० च्या सुरुवातीला न्युझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर विश्वचषकात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केलं.
यूएई (९)
२०१६-१७ दरम्यान युएईला लागोपाठ ९ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. यूएई आशिया चषक २०१६ मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशकडून ४ सामने पराभूत झाले.
त्यानंतर अफगाणिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असा त्यांचा पराभव केला. २०१७ च्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या डेजर्ट टी२० मालिकेत अफगाणिस्तान आणि आयर्लंडने त्यांना पराभूत केलं होतं.
वाचनीय लेख-
-बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने घेतली होती शपथ; ऑफ साईडला नाही म्हणजे नाहीच खेळणार
-कोहलीचा कर्णधारपदाचा मुकूट भविष्यात परिधान करु शकतात हे युवा ३ क्रिकेटर
-‘वडीलांचे निधन झाले, नाहीतर अजून एक कपिल देव जन्माला आला असता’