इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यचा निर्णय घेण्यात आला होता. पण बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये होते. अशात आम्ही अशा काही महत्वपूर्ण खेळींती तुम्हाला आठवण करुन देणार आहोत, ज्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांनी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळल्या होत्या. (3 top class innings by rcb batsman in first phase of ipl 2021)
१) एबी डिविलियर्स : आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या धावा ६ बाद १०६ झाल्या होत्या. एकीकडे गडी बाद होत होते; तर दुसरीकडे एबी डिविलियर्सने एक बाजू धरून ठेवली होती. त्याने २७ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा मदतीने ४७ धावांची खेळी केली होती. तसेच हा सामना देखील संघाला जिंकून दिला होता.
२) ग्लेन मॅक्सवेल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी खेळी केली होती. पहिल्या १० षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अडचणीत आला होता. परंतु ग्लेन मॅक्सवेलने ९ चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने ७८ धावांची खेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची धावसंख्या २०० पार नेली होती. तसेच संघाला ३८ धावांनी विजयही मिळवून दिला होता.
३) देवदत्त पडीक्कल : आयपीएल २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीलाच देवदत्त पडीक्कलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. परंतु राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी १७८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना, पडीक्कलने ५२ चेंडुंमध्ये ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. त्याच्या या तूफानी खेळीमुळे संघाने १० विकेट्सने तो सामना खिशात घातला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
असे ३ गोलंदाज, जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात घेऊ शकतात सर्वाधिक विकेट्स; २ भारतीयांचा समावेश
‘या’ ३ कारणांमुळे रोहितला टी२०चा कर्णधार बनवणे बीसीसीआयची मोठी चूक, नंतर होईल पश्चाताप!