---Advertisement---

महिला टी२० विश्वचषक फायनल: कर्णधारासह ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडू तंबूत

On: रविवार, मार्च 8, 2020 1:51 PM
---Advertisement---

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रलियाकडून एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी सलामीला फलंदाजीला येताना तुफानी फटकेबाजी केली. या दोघींनीही सलामीला ११.४ षटकातच ११५ धावांची भागीदारी रचली. पण अखेर राधा यादवने हेलीला ७५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

हिली बाद झाल्यानंतर लगेचच १७ व्या षटकात दिप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि एश्ले गार्डनरला बाद करत ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. तिने या षटकात टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर लेनिंगने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तिचा झेल स्क्वेअर लेगला असणाऱ्या शिखा पांडेने घेतला.

त्यापाठोपाठ गार्डनरला या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यष्टीरक्षक तानिया भाटियाने तिला यष्टीचीत केले. लेनिंगने १६ धावा केल्या. तर गार्डनर २ धावा केल्या.

तसेच ऑस्ट्रेलियाकडून मूनीचे अर्धशतक झाले आहे. ऑस्ट्रेलियाने १८ षटकात ३ बाद १६७ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---