---Advertisement---

हे ३ युवा खेळाडू यंदाच्या आयपीएलमुळे रातोरात आले प्रसिद्धीझोतात

On: गुरूवार, मे 6, 2021 11:06 AM
---Advertisement---

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे बीसीसीआयने मंगळवारी यंदाचा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याची घोषणा केली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे अर्धेच सामने झाले असतांना यंदाच्या हंगामाला विराम लागला.
मात्र तरीही यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले. आपल्या खेळाने त्यांनी क्रिकेट चाहत्यांच्या मानत स्थान मिळवले. आजच्या लेखात आपण याच तीन खेळाडूंबाबत जाणून घेऊया.

१) चेतन सकारिया –
राजस्थान रॉयल्सच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने यंदा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. छोट्या चणीचा चेतन फारसा वेग नसला स्लोअर बॉल टाकण्यात माहीर आहे. याच आयुधाच्या जोरावर यंदा त्याने भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणले. यंदाच्या त्याने हंगामात ७ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. ज्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीच्या विकेटचाही समावेश होता. चेतनने आपल्या सातत्याने क्रिकेट पंडितांनाही प्रभावित केले.

२) आवेश खान –
दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होता. त्याने ८ सामन्यात तब्बल १४ विकेट्स घेतल्या. उमेश यादव, इशांत शर्मा असे आंतरराष्ट्रीय खेळाडू असतांना देखील त्याला संघात सातत्याने स्थान मिळाले, यातच त्याचे यश सामावले आहे. आवेश खानने यंदा शेवटच्या षटकांमध्ये टाकलेल्या यॉर्कर्सने भल्याभल्या फलंदाजांना फटके मारण्यापासून रोखले.

३) हरप्रीत ब्रार –
हरप्रीत ब्रार हा यंदाच्या हंगामाची खऱ्या अर्थाने दंतकथा ठरल्या. संघर्ष करत असलेल्या पंजाब किंग्जने आरसीबी विरूद्धच्या सामन्यात हरप्रीत ब्रारला संधी दिली. त्याने या संधीचे सोने करत एकाच सामन्यात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गज फलंदाजांना बाद केले. त्यामुळे पंजाबला या सामन्यात विजय मिळवता आला. यानंतर हरप्रीतने एकच सामना खेळला ज्यात त्याने एक विकेट पटकावली.

महत्त्वाच्या बातम्या –

सिराजच्या भेदक यॉर्कर्सने माजी क्रिकेटपटू झाला प्रभावित, प्रशंसा करत म्हणाला

पंतप्रधानांनी स्वतः यावे आणि भारतात रस्त्यावर पडलेले मृतदेह पहावे, मायकेल स्लेटर पुन्हा बरसला

दबाव झेलता न आल्याने आईसमोर बसून रडायचा पुजारा, मग अशी केली समस्येवर मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---