---Advertisement---

दुसऱ्या दिवशी काही मिनीटांतच कोहलीचा कसोटीत भीमपराक्रम

On: शुक्रवार, ऑक्टोबर 5, 2018 10:22 AM
---Advertisement---

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी कर्णधार कोहलीने एक खास पराक्रम केला. भारतात कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजार धावा करणारा तो ११ खेळाडू ठरला आहे.

विराटने भारतात ३३ सामन्यात ५३ डावात फलंदाजी करताना ६५.४१च्या सरासरीने ३००९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १० शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

भारतात ३ हजार धावा ६५च्या सरासरीने करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

भारतात कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने ९४ कसोटीत ५२.६७च्या सरासरीने ७२१६ धावा केल्या आहेत.

भारतात ३ हजार धावा करताना विराटने केवळ ५३ डाव घेतले आहे. चेतेश्वर पुजारानेही केवळ ५३ डावात हा कारनामा केला होता. कमी डावात ३ हजार धावा करण्याचा पराक्रम आता या दोन खेळाडूंच्या नावार झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विंडीज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान

विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment