इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात काल न्यूझीलंडने अतिशय नाट्यमयरीत्या कसोटी सामना वाचवला. याबरोबर २ सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली.
या सामन्यात एक खास विक्रमही झाला. इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत हा विक्रम केला.
तो कसोटी क्रिकेटमध्ये ३० हजार चेंडू टाकणारा ५वा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे सर्वाधिक चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो त्याच दिवशी कर्टनी वाॅल्श यांना मागे टाकत चौथ्या स्थानावर विराजमान झाला.
१३६ कसोटी सामन्यात त्याने आजपर्यंत २५३ डावात गोलंदाजी करताना ३०,०७४ चेंडू टाकले आहे. यात त्याने ५३१ विकेट्सही घेतल्या आहेत.
सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो आता पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ५व्या स्थानावर असून वेगवान गोलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅकॅग्रा (५६३) नंतर दुसऱ्या स्थानी आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ३० हजार चेंडू टाकणारे ५ गोलंदाज-
४४०३९- मुथय्या मुरलीधरन- १३३ कसोटी सामने
४०८५०- अनिल कुंबळे- १३२ कसोटी सामने
४०७०५- शेन वार्न- १४५ कसोटी सामने
३००७४-जेम्स अॅंडरसन- १३६ कसोटी सामने
३००१९-कर्टनी वाॅल्श – १३२ कसोटी सामने