भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून (१२ मार्च) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. हे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. या सामन्यासाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका विशिष्ट यादीत आपले नाव जोडले.
या यादीत समाविष्ट झाला विराट
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात नाणेफेकीसाठी जाताच भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला ३०० वा टी२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. विराटने सर्वाधिक टी२० सामने हे आयपीएलमध्ये खेळले आहेत.
आयपीएलच्या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत त्याने आत्तापर्यंत १९२ सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ, भारताचे ८६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले आहे. विराटने चॅम्पियन्स लीगच्या १५ सामन्यात देखील भाग घेतला आहे. भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे ५ तर, २०११ इंग्लंड दौऱ्यावर दोन अधिकृत टी२० सामन्यात त्याने सहभाग नोंदविला होता.
यापूर्वी चार भारतीयांनी खेळले आहेत ३०० टी२० सामने
भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक ३४० टी२० सामने रोहित शर्माने खेळले आहेत. त्यापाठोपाठ भारताचा विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीने ३३१ टी२० सामन्यात सहभाग घेतला आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना व अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यांनी अनुक्रमे ३२४ व ३१० सामने खेळले आहेत.
पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात
टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्या षटकात सलामीवीर केएल राहुल, तिसऱ्या षटकात कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या षटकात शिखर धवन बाद झाले. दहाव्या षटकात जम बसलेला रिषभ पंत देखील बाद झाला. दहा षटकाच्या अखेरीस भारताची धावसंख्या ४ बाद ४८ अशी झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
लिझेल लीचे शानदार शतक; तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा भारतावर विजय, मालिकेतही घेतली आघाडी
अर्धवट नशेत असताना हर्षल गिब्जने दक्षिण आफ्रिकेला वनडे मिळवून दिला होता अविस्मरणीय विजय
आयपीएल २०२१ : ‘हा’ फलंदाज म्हणतो मला चेन्नई सुपर किंग्सकडून करायची आहे सलामीला फलंदाजी