दिल्ली। आज (28 सप्टेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केला आहे.
त्याने दिल्ली संघाकडून आज केरळ विरुद्ध खेळताना 104 चेंडूत 151 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. याबरोबरच त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये(प्रथम श्रेणी, अ दर्जा, टी20) 31 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे.
हा टप्पा पार करणारा तो चौथाच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा कारनामा सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी केला आहे.
याबरोबरच त्याची ही क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही आहे. तसेच त्याचे हे अ दर्जाच्या क्रिकेटमधील 20 वे शतक आहे. त्यामुळे तो आता अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सहाव्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत त्याच्या पुढे सचिन(60), विराट कोहली(39), सौरव गांगुली(31), शिखर धवन(26), राहुल द्रविड(21) आणि रोहित शर्मा(21) हे आहे.
गौतमने आज दिल्ली विरुद्ध केरळ सामन्यात दिडशतक करताना उन्मुक्त चंद बरोबर पहिल्या विकेटसाठी 172 धावांची आणि ध्रुव शोरे बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. तसेच तो 151 धावा केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला.
ध्रुवने या सामन्यात नाबाद 99 धावा तर उन्मुक्तने 69 धावा केल्या केल्या आहेत. या तिघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने केरळ समोर विजयासाठी 392 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
परंतू केरळला या लक्ष्याचा पाठलाग करताना 227 धावाच करता आल्याने दिल्लीने 165 धावांनी या सामन्यात विजय मिळवला. केरळकडून या सामन्यात वासूदेव अनिरुद्ध जगदीशने नाबाद 59 धावा करत एकाकी लढत दिली.
सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये 31 हजार धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज-
50192 धावा – सचिन तेंडुलकर
41651 धावा – राहुल द्रविड
33035 धावा – सौरव गांगुली
31000 धावा – गौतम गंभीर
30428 धावा – सुनील गावस्कर
महत्वाच्या बातम्या-
–आज धोनीला ‘कूल’ विक्रम करण्याची संधी; होणार सचिन, द्रविडच्या यादीत सामील!
–टाॅप ५- आज हे खेळाडू एशिया कपच्या अंतिम सामन्यात करु शकतात मोठा कारनामा
–बांगलादेशने कंबर कसली; आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने