आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून नावाजला जाणाऱ्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२ हंगामात मात्र चांगले प्रदर्शन करता आलेले नाहीये. चालू हंगामातील सुरुवातीच्या आठ सामन्यांमध्ये लागोपाठ पराभव मिळवणारा मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. या खराब प्रदर्शनाचे कारण ठरले आहे मुंबईचे गोलंदाजी आक्रमण. परंतु संघात आता एका अनुभवी गोलंदाजाचे आगमन झाले आहे.
मध्यमगती वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चालू आयपीएल हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीये. बुमराहला इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथही मिळालेली नाही. अशात आता धवल संघासाठी एक आशेचा किरण बनण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ३३ वर्षीय धवल मुंबईच्या बायो-बबलमध्ये सहभागी झाला आहे आणि सराव देखील सुरू केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होण्यापूर्वी धवल अधिकृत प्रसारकांच्या समालोचकांपैकी एक होता. अशी माहिती मिळाली आहे की, जर धवलने सराव सत्रात चांगेल प्रदर्शन केले, तर हंगामातील उरलेल्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले जाऊ शकते. मुंबई सलग आठ पराभवांनंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी संघाला लीग स्टेजचे १४ सामने खेळणे भाग आहे. उरलेल्या ६ सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करण्याच्या पार्श्वभूमीवीर धवलला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सला धवल कुलकर्णीकडून खूप अपेक्षा असतील. कारण, तो मुंबईच्या रणजी संघाचा नियमित खेळाडू आहे. त्याच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८मध्ये त्याने या स्पर्धेत पदार्पण केले होते आणि आतापर्यंत एकूण ९० आयपीएल सामने खेळला आहे. यादरम्यान त्याच्या नावावर ८६ विकेट्सची नोंद आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व त्याने केले आहे. लीगमध्ये तो मुंबई आणि गुजरातसाठी काही सामने खेळला, पण राजस्थानचे प्रतिनिधित्व मोठ्या काळापर्यंत केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार विकेट्स घेऊनही पंतने कुलदीपला का दिले नाही त्याच्या हक्काचे चौथे षटक? स्वत:च सांगितले कारण
धोनीचा शिष्य शोभतोय! पंतने अवघड कॅच घेत कोलकाताच्या कर्णधाराला धाडले तंबूत; त्यालाही बसेना विश्वास
उमरान मलिकने हार्दिक पंड्याच्या पत्नीची हात जोडून मागितली क्षमा, पण का? घ्या जाणून