---Advertisement---

धक्कादायक! खेळपट्टीवर धावताना फलंदाजाचे निधन, सहकाऱ्यांनी CPR देऊनही सोडले प्राण

On: बुधवार, जानेवारी 10, 2024 3:47 PM
धक्कादायक
---Advertisement---

क्रीडाविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. नॉयडामध्ये 34 वर्षीय फलंदाजाने लाईव्ह क्रिकेट सामन्यात जीव गमावला. एका कार्पोरेट लीगमध्ये ही घटना घडली आहे. लाईव्ह सामन्यात अखेरचा श्वास घेतलेल्या खेळाडूचे नाव विकास नेगी असे होते. माध्यमांतील वृत्तांनुसार ह्रदयविकाराच्या झटका आल्याने त्याने जीव गमावल.

नॉयडामध्ये एक कार्पोरेट लीग आयोजित केली गेली होती. या स्पर्धेत मॅवरिक्स झलेवन आणि ब्लँजिंग बुल्स या संघांमध्ये आमना सामना झाला. मॅवरिक्स संघ पलंदाजी करत होता. खेळपट्टीवर उमेश कुमार आणि विकास नेगी (Vikas Negi) हे दोन फलंदाज होते. डावातील 14व्या षटकात उमेश कुमार चौकार मारला. विकार नॉन स्ट्राईक एंडवर होता आणि त्याने स्ट्राईकर एंडवर असणाऱ्या फलंदाजाल शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. पण उमेशच्या जवळ पोहोचण्याआधीच विकास खेळपट्टीवर खाली पडला.

खेळपट्टीवर पडलेल्या विकासला पाहून संघातील सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने त्याच्या दिशेने धाव घेतली. काही खेळाडूंनी त्याचा जीव वाचवण्यासाठी CPR दिला. त्याला काही वेळ जमिनीवर ठेवले गेले. पण त्याच्या तब्यतीत सुधारणा दिसत नसल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात हलवले गेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर विकासला मृत घोषित केले गेले. विकास नेगी पेशाने एक इंजीनियर होता.

दरम्यान, ह्रदयविकाराचा झटका येण्याआधी विकासने आपल्या संघासाठी 7 धावा केल्या होत्या. यासाठी त्याला 6 चेंडू खेळावे लागले. तो खेळपट्टीवर येण्याआधी त्याचा संघ 5 विकेट्सच्या नुकसानावर 13.5 षटकांमध्ये 143 धावांपर्यंत पोहोचा होता. हा सामना युट्यूबवर लाईव्ह दाखवला जात होता. ब्लँजिंग बुल्स संघाने या सामन्यात प्रथन फलंदाजी केली आणि 19.2 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 183 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना S&B इंडिया एनुअल क्रिकटे टुर्नामेंटमध्ये आयोजित केला गेला होता. पण खेळाडूने जीव गमावल्यानंतर ही स्पर्धाही थांबवण्यात आली. (34-year-old Vikas Negi died of cardiac arrest during a live match)

महत्वाच्या बातम्या – 
तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतकवीर ठरली कर्णधार Alyssa Healy, परभवासह भारातने मालिकाही गमावली
Mumbai Cricketer Dies: मुंबईच्या दिग्गज क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू, मैदानावरच घेतला अखेरचा श्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---