---Advertisement---

ठरलं तर! पुढच्या वर्षी पुन्हा रंगणार राष्ट्रीय स्पर्धांचा कुंभमेळा, गुजरातनंतर ‘या’ राज्याकडं यजमानपद

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 7:30 PM
National-Games
---Advertisement---

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांबद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील वर्षीच्या म्हणजेच 2023मध्ये 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन गोवा येथे होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गोव्याला या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. गोव्याने स्पर्धेचे शेवटचे यजमानपद हे नोव्हेंबर 2016मध्ये भूषवले होते. मात्र, आता या बातमीने गोव्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (Indian Olympic Association) महासचिव राजीव मेहता यांनी क्रीडा सचिव अजित राय यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले की, “आयओए गोव्यात 2023मध्ये 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी गोवा सरकारचे समर्थन मिळाल्याने खुश आहे. तसेच, गोव्यात 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आयओए मान्यता देत आहे.”

https://twitter.com/Govind_Gaude/status/1578378129885626368

पुढे बोलताना ते म्हणाले की, “12 ऑक्टोबर, 2022 रोजी गुजरातमधील सुरत येथे 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभात गोव्याच्या शिष्टमंडळाला IOA ध्वज मिळू शकतो.” भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हटले की, या स्पर्धांच्या तारखांचा निर्णय नंतर घेतला जाईल.

“पुढील वर्षीच्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तारखांचा निर्णय 19व्या आशियाई खेळांच्या तारखा लक्षात ठेऊन घेतला जाईल. आशियाई स्पर्धांचे आयोजन 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023दरम्यान चीनच्या हांगझू येथे होणार आहे,” असेही पुढे बोलताना ते म्हणाले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद 2008मध्ये गोव्याकडे
विशेष म्हणजे, 2008मध्ये गोव्याकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद सोपवण्यात आले होते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे या राज्याला आयोजन करण्यास अडचण येत होती. त्यामुळेच यावर्षीच्या म्हणजेच 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद गुजरातकडे सोपवावे लागले होते. गुजरातनेही कमी कालावधीत या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी संमती दर्शवली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

शेफालीने टी20त रचला इतिहास, तिच्या वयाच्या कुठल्याच खेळाडूला जमला नाही ‘असा’ पराक्रम
शॉकिंग! विश्वचषकात ‘या’ दिग्गजाने भारतीय खेळाडूंना दिलेला सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला, वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---