---Advertisement---

दुसऱ्या टी२० नंतर आता तिसऱ्या सामन्यालाही उशीर, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार मॅच?

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 12:05 PM
Rohit-Sharma-Nicholas-Pooran
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील २ सामने पार पडले असून मालिका १-१ ने बरोबरीत आहे. आता तिसरा सामना मंगळवारी (०२ ऑगस्ट) सेंट्स किट्स येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवरच खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. उभय संघातील या सामन्याला सुरुवात होण्यास थोडा उशीर होणार आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) ट्वीट करत याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात २ ऑगस्ट रोजी होणारा तिसरा टी२० सामना (Third T20I) भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता खेळला जाईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे आता ९ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक होईल. यापूर्वी हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार (Delay In Third T20I) होता.

तिसऱ्या टी२० सामन्याला उशीर होण्यामागचे कारण स्पष्ट करताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने म्हटले की, ‘सोमवारी (०१ ऑगस्ट) झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्याला उशीर झाल्याने खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी आणि एकामागोमाग एक सामन्यांसाठी वेळ मिळेल याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.’

दुसऱ्या टी२० सामन्यालाही झाला होता उशीर
दरम्यान तिसऱ्या टी२० सामन्याप्रमाणेच दुसऱ्या टी२० सामन्याची सुरुवात व्हायलाही उशीर झाला होता. १ ऑगस्ट रोजी मालिकेतील दुसरा सामना हा भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र, हा सामना तीन तास उशिराने अर्थात ११ वाजता सुरू झाला. खेळाडूंचे साहित्य उशीरा पोहोचल्याने सामना सुरू व्हायला उशीर झाला होता.

याबद्दल वेस्ट इंडिज क्रिकेटने ट्वीट करत माहिती देताना म्हटले होते की, ‘खेळाडूंचे साहित्य घेऊन येणारे वाहन उशिरा येणार असल्याने दुसऱ्या सामन्याला उशीर होईल. हा सामना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी (वेस्ट इंडिज प्रमाण वेळेनुसार) सुरू होईल. आमच्या प्रसारणकर्त्यांना व चाहत्यांना झालेल्या या सुविधेबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.’

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ओबेड मॅकॉयने लगावला विकेट्सचा ‘षटकार’, बनलाय भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

ओबेद मॅकॉयने ‘हिला डाला’! भारताविरुद्ध सामनावीर बनल्यानंतर दिली हृदयास भिडणारी प्रतिक्रिया

रोहितने अविश्वास दाखवलेल्या खेळाडूने ठोकले तब्बल ४० षटकार; स्ट्राईक रेट होता…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---