बुधवारी( 19 डिसेंबर) बिग बॅश लीगच्या 8 व्या मोसमाला सुरुवात झाली आहे. या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट पहायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ब्रिस्बेन हिट विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात होता.
या सामन्यात थर्ड अंपायने बाद दिलेला ब्रिस्बेनचा फलंदाज जेम्स पॅटिन्सनला अॅडलेड संघाने धावबादचा निर्णय रिव्ह्यू पाहिल्यानंतर न पटल्याने पुन्हा फलंदाजीला बोलावले. त्यांनी दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले आहे.
झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या ब्रिस्बेन हिटच्या डावात 12 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पॅटिन्सन आणि जिमी पिअरसन यांनी एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी अॅडलेडच्या क्षेत्ररक्षकांने पॅटिन्सन धावत असलेल्या एन्डला चेंडू यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरेकडे फेकला. कॅरेनेही चूक न करता स्टंपवरील बेल्स उडवत बादसाठी अपील केले.
पण मैदानावरील पंचांच्या पॅटिन्सन बाद आहे की नाही हे न कळल्याने त्यांनी तो निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. यावेळी रिव्ह्यूमध्ये दिसून आले की बेल्स उडण्याआधी पॅटिन्सनच्या बॅटीचा पुढील भाग क्रिजच्या आत आला आहे. मात्र तरीही थर्ड अंपायर असणारे ग्रेग डेव्हिडसन यांनी त्याला बाद ठरवले.
त्यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला. मैदानावरील पंच सिमन फ्राय आणि पॉल विल्सन हे देखील गोंधळात पडले. पॅटिन्सनही मैदानात तसाच थांबला. त्याचबरोबर बाउंड्री लाइनच्या बाहेर ब्रिस्बेनचा कर्णधार ख्रिस लिनही अंपायरशी चर्चा करत होता. पण थर्ड अंपायरने बाद दिल्याने पॅटिन्सन मैदानातून बाहेर जाणार जाणे भाग होते.
परंतू त्यानंतर अॅडलेडचा कर्णधार कॉलिन इंग्रामने गोलंदाज बेन लाफलिनबरोबर चर्चा केली. त्यावर लाफलिनने पॅटिन्सनला परत बोलण्याची कल्पना दिली.
तसेच त्यांचा यष्टीरक्षक कॅरेने सांगितले की त्यांनी हा निर्णय ती घटना घडल्यानंतर लगेचच घेतला होता. कारण त्यांना रिव्ह्यू पाहिल्यानंतर पॅटिन्सन बाद असल्याचे पटले नव्हते.
OUT OR NOT OUT!? .. You'll struggle to see a more bizarre sequence of events on a cricket field! 🤷 but somehow, @_jamespattinson survives.. we think!? Thoughts @HeatBBL!?
LIVE: https://t.co/qBWBtp7D2d pic.twitter.com/BRoTDHyIsE— Telegraph Sport (@telegraph_sport) December 19, 2018
पॅटिन्सनला या जीवदानाचा फायदा घेता आला नाही तो पुढच्याच षटकात एक चौकार मारुन बाद झाला. त्याला कॅरेने यष्टीचीत केले.
ब्रिस्बेनने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 146 धावा करत 147 धावांचे आव्हान अॅडलेड समोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना अॅडलेडने शेवटच्या षटकात 5 विकेट्स बाकी ठेवत हे आव्हान सहज पार केले.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयपीएल- एकवेळ दिल्ली गाजवलेला खेळाडू आता मुंबईच्या ताफ्यात
–एकवेळ टीम इंडियाला धू-धू धूणारा फलंदाज घेतोय सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास
–Video: चेंडू स्टेडियमच्या छताला लागला म्हणून फलंदाजाला दिला षटकार
–कोण आहे हा १६वर्षांचा खेळाडू जो ठरला आयपीएलमधील यंगेस्ट करोडपती