मुंबई । कोरोना व्हायरसच्या सावटात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पुन्हा क्रिकेट सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली होती. त्यांनी 3 टी क्रिकेट’ टूर्नामेंट ‘सोलिडेरिटी कप’ आयोजित करण्याचे ठरविले होते. यानुसार एकाच सामन्यात तीन संघ मैदानावर खेळताना दिसून येणार होते.
27 जूनपासून क्रिकेटच्या इतिहासात असा अनोखा सामना क्रिकेट फॅन्सला पहिल्यांदा पाहता येणार होता. ज्याची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने भागीदारांशी संवाद साधल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आणखी काम करायचे असल्याचे सांगत स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसात या स्पर्धेची तारीख नव्याने जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सीएसएने या स्पर्धेविषयी ट्वीट केले की, ‘सोलिडेरिटी सामन्यात भाग घेणारे संघ आणि स्पर्धेच्या भागीदारांनी सीएसए, 3 टी क्रिकेट आणि सुपरस्पोर्टबरोबर 27 जून रोजी होणाऱ्या सामन्याच्या तयारीबद्दल बैठक घेतली. बैठकीनंतर हे स्पष्ट झाले की त्याच्या तयारीसाठी अजून काम करणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत नवीन तारखेची घोषणा केली जाईल.’
Following this meeting, it has become clear that more work is needed in preparation including approval.
A new date will be announced in due course.— Proteas Men (@ProteasMenCSA) June 20, 2020
कोरोना व्हायरसमुळे गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानावरचा रोमांच पाहता आला नाही. या अनोख्या स्पर्धेमुळे क्रिकेटचे सामने लाइव्ह पाहता आले असते. या स्पर्धेत एकाच मॅचमध्ये तीन संघ सामील होणार होते. ज्यात एका संघाचा कर्णधार माजी खेळाडू एबी डी व्हिलियर्स, दुसऱ्या संघाचे नेतृत्व डिकॉक तर तिसऱ्या संघाचे नेतृत्व कागिसो रबाडाकडे होते.
‘सोलिडेरीटी चषक’या नावाने हा चॅरिटी सामना खेळवण्यात येणार होता. यातून जमा झालेली रक्कम कोरोना व्हायरसने पीडित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी दान करण्यात येणार होता. या अनोख्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नियमांमध्ये अनेक बदल केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
मॅक्सवेलला बाद करण्यासाठी एमएस धोनीने सांगितली होती ‘ही’ आयडिया
पाकिस्तानचा खेळाडूही बनलाय रोहितचा मोठा चाहता; म्हणतोय, आता मलाही…
ताशी १५४.४ किमी वेगाने गोलंदाजी करणारा ‘तो’ भारतीय गोलंदाज म्हणून झाला लवकर निवृत्त