जेव्हा टी२० क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा अनेकांना वाटलं, हा खेळ बॅट आणि बॉलमधील संघर्ष चांगलाच धारदार करेल, पण सगळं उलट झाला. अपवाद सोडला तर बॉलर्सची क्रिकेटच्या या अधिकृतरित्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये नेहमी धुलाईच झाली. म्हणजेच टी२० क्रिकेटवर बॅटर्सने आपले वर्चस्व गाजवले. ख्रिस गेल, ब्रेंडन मॅकलम, एबी डिव्हिलियर्स हे प्लेयर अक्षरशा बॉलर्सची कत्तल करत. दर चौथ्या मॅचला कोणी ना कोणी शतक मारत. छोटी ग्राऊंड आणि नियम बॉलर्सच्या काहीसे विरोधात गेल्याने बॅटर्सला टी२० क्रिकेट म्हणजे नंदनवन वाटू लागले.
बॅटर्सचा गेम बनलेल्या टी२० मध्ये शतकांवर शतक पाहून असं नक्कीच वाटू लागले आहे की, या १२० बॉलच्या खेळात एखाद्या दिवशी कोणीतरी एकटा बॅटर डबल सेंचुरी मारायचा. गेल, ऍरॉन फिंच पावणे दोनशेपर्यंत गेलेत, तर मॅकलम, मॅक्सवेलन दीडशेच्या पार जाण्याची कामगिरी केलीय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच बॅटर्सवर नजर टाकणार आहोत जे, टी२० मध्ये डबल सेंचुरी मारायचा दम राखतात.
जोस बटलर
टी२० क्रिकेटचा सध्याचा सर्वोत्तम बॅटर कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर एकमुखाने सर्वजण नाव घेतील जोस बटलर. इंग्लंडचा हा व्हाईस कॅप्टन सध्या जगभरात टी२० क्रिकेटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. इंटरनॅशनल असो नाहीतर फ्रॅंचायजी क्रिकेट असो, बटलरची बॅट थांबेना. ओपनिंगला येऊन तो फक्त बॉलर्सची पिसे काढतोय. सध्या आयपीएलमध्येच त्याने फक्त सात मॅचमध्ये ४९१ रन केलेत. ते पण तीन शतके मारून. त्याचा हा फॉर्म आणखी काही दिवस असाच राहिला तर बटलर टी२० क्रिकेटमध्ये डबल सेंचुरी मारणारा पहिला पहिला बॅटर झाल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको.
हेही पाहा- टी२०मध्ये द्विशतक करु शकतील असे ५ क्रिकेटर
रोहित शर्मा
मागे एकदा आयपीएलची एक जाहिरात आलेली. त्यामध्ये म्हटले गेलेलं ‘शर्माजी का बेटा कही दो सौ ना जड दे.’ हा शर्माजी का बेटा म्हणजे इंडियन कॅप्टन रोहित शर्मा. रोहित शर्मा हा क्रिकेट जगतातील एकमेव बॅटर आहे, ज्याने वनडेत एक नव्हे तर तब्बल तीन डबल सेंचुरी मारल्यात. इंटरनॅशनल टी२० क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर तीन शतके आहेत. रोहित आपल्या टॉप फॉर्ममध्ये असल्यावर किती धोकादायक आहे याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. रोहित त्याच्या त्याच टॉप फॉर्ममध्ये खेळल्यास टी२० तही २०० त्याच्यापासून दूर नाही.
निकोलस पूरन
वेस्ट इंडीजचे क्रिकेटर्स हे फक्त टी२० क्रिकेटसाठीच बनलेत असं सारेच म्हणतात. कारण, टी२० चे सारे सुपरस्टार वेस्ट इंडीजचेच. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, मार्लोन सॅम्युअल्स यांच्यानंतरची दुसरी पिढीही आता टी२० क्रिकेटमध्ये तुफान आणतेय. त्यापैकीच एक आहे निकोलस पूरन. जगभरातील साऱ्याच टी२० आणि टी१० लीगमध्ये पूरनला जोरदार मागणी असते. वेस्ट इंडीजचा कॅप्टन असलेल्या पूरनने अगदी कमी कालावधीत साडेचार हजार टी२० रन्स बनवलेत. त्याचा स्ट्राईक रेटही १४० च्या वरच राहतो. हाच पूरन ओपनिंगला उतरला तर टी२० त आरामात डबल सेंचुरी मारू शकतो.
लियाम लिव्हिंगस्टोन
सध्या टी२० क्रिकेटच्या क्षितिजावर एक नाव नव्याने उदयाला आले आहे. ते नाव आहे इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनचे. क्रिकेटजगतात आत्तातरी त्याच्या इतके आणि सहजरीत्या सिक्सेस मारणारा बॅटर दुसरा कोणी दिसत नाही. इंटरनॅशनल क्रिकेट आणि फ्रॅंचायजी क्रिकेटमध्ये त्याचा परफॉर्मन्स खूपच स्फोटक दिसतो. १०० मीटरपेक्षा लांब सिक्स तो आरामात मारताना दिसतो. १७० मॅचमध्येच तो १५० च्या स्ट्राईक रेटने ४०० टी२० रनांच्या पुढे गेलाय. त्याच्या हिटिंग एबिलिटीमुळे त्याने एकेदिवशी टी२० क्रिकेटमध्ये, २०० रनांची इनिंग खेळली तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर
मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?






