आतापर्यंत भारतीय क्रिकेट इतिहासात बरेच दिग्गज खेळाडू होऊन गेले. भारतीय क्रिकेट इतिहासात जसे अनेक महान फलंदाज झाले आहेत, असे अनेक महान गोलंदाज झाले आहेत ज्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि भारतीय संघाला बरेच पुढे नेले. फलंदाजी आणि गोलंदाजीत एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू भारतीय संघाला मिळाले. याबरोबरच भारतीय क्रिकेट संघाकडून कपिल देव, युवराज सिंग, इरफान पठाण असे अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू खेळले आहेत. त्यांनी भारतीय संघाला मोठे विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
क्रिकेटमध्ये जसे फलंदाज आणि गोलंदाज महत्त्वाचे असतात तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू महत्त्त्वाचे असतात. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याने संघाला समतोल साधून देतात. भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक अष्टपैलू आहेत ज्यांनी एकाच सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीचा प्रभाव पाडला आहे.
तर या लेखात तुम्हाला अशाच ४ दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी एकाच वनडे सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत आणि सोबतच ४ किंवा त्यापेक्षा अधिक बळीही घेतले आहेत.
१. ख्रिस श्रीकांत (K. Srikkanth) – ७० धावा आणि ५ बळी वि. न्यूझीलंड, १९८८
भारतीय क्रिकेट संघात सलामीवीरांचा विचार केला तर काही फलंदाज फारच धोकादायक ठरले. या फलंदाजांमध्ये असे अनेक फलंदाज आहेत ज्यांनी ८० च्या दशकात आश्चर्यकारक कामगिरी केली. त्यावेळी भारतीय संघात तमिळनाडूचा फलंदाज कृष्णमाचारी श्रीकांत होते. तेव्हा श्रीकांतची फलंदाजी खूप आक्रमक मानली जात होती. त्यांना त्यावेळी भारतीय संघातील सर्वात स्फोटक फलंदाज मानले जात होते.
श्रीकांत यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी बरीच चांगली खेळी खेळली. त्यातच एका सामन्यात त्यांनी अष्टपैलू कामगिरी होती. १९८८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करत श्रीकांतने ५ गडी बाद केले आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये ७० धावांची खेळी करून संघाला धावा जमवण्यात हातभार लावला.
२. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) – १४१ धावा आणि ४ बळी वि. ऑस्ट्रेलिया, १९९८
भारतीय क्रिकेट संघातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमांबद्दल सर्वांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या फलंदाजीने एकामागून एक असे मोठे विक्रम नोंदविले आहेत. सचिन तेंडुलकर आपल्या फलंदाजीबरोबर उपयुक्त फिरकी गोलंदाजी करण्यासही सक्षम होता.
अशाचप्रकारे सचिन तेंडुलकरने १९९८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. सचिनने या सामन्यात शानदार १४१ धावांची खेळी केली आणि त्याव्यतिरिक्त गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत ४८ धावा देऊन ४ बळी घेतले.
३. सौरव गांगुली (Sourav Ganguly) – १३० धावा आणि ४ बळी वि. श्रीलंका, १९९९
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेटला नवे रूप दिले आणि एका उंचीवर नेऊन ठेवले. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटचा महान कर्णधार असून त्याने आपल्या फलंदाजीने वेगळी ओळख निर्माण केली होती.
फलंदाजीसह सौरव गांगुलीसुद्धा बऱ्याचदा गोलंदाजी करताना दिसला. गांगुली हा कामचलाऊ गोलंदाज असला तरी त्याने १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत चमक दाखवली. गांगुलीने या सामन्यात १३० धावा केल्या आणि त्याला ४ बळी मिळवण्यात यश आले.
४. युवराज सिंग (Yuvraj Singh) – ११८ धावा आणि ४ बळी वि. श्रीलंका, २००८
भारतीय क्रिकेटमध्ये माजी स्टार अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगचे एक वेगळे स्थान आहे. युवराज सिंगने भारतीय संघासाठी बरेच योगदान दिले आहे आणि उत्तम फलंदाजीने प्रभाव पाडला. युवराज सिंग गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा म्हणाला.
युवराज सिंगने गोलंदाजी आणि फलंदाजी असे दोन्ही बाजूने सामन्यात शानदार प्रदर्शन केले. २००८ मध्ये युवराज सिंगने श्रीलंकेविरुद्ध ११८ धावांच्या खेळीसह ४ बळी घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा
हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल
क्रिकेट जगतातील हे दिग्गज ५ खेळाडू, ज्यांना हासताना चाहत्यांनी फारच क्वचित पाहिले
महत्त्वाच्या बातम्या –
या दिग्गजाचा गजब खुलासा, ‘दुखापतीमुळे केला होता ३८० धावांचा विश्वविक्रम’
विलियम्सनला खास बर्थडे गिफ्ट देत ‘या’ खेळाडूने केली भारतीय चाहत्याची बोलती बंद