---Advertisement---

वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा

On: रविवार, ऑगस्ट 9, 2020 5:05 PM
---Advertisement---

२००३ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट मंडळ व खेळाडू यांच्यात झालेल्या वादानंतर अनेक झिम्बाब्वियन खेळाडू झिम्बाब्वे क्रिकेटपासून बाजूला झाले. हीथ स्ट्रीक व अँडी फ्लॉवर सोडले तर जवळपास सगळेच मोठे खेळाडू हे क्रिकेटमधून निवृत्त झाले अथवा इंग्लंडमध्ये कोलपॅक करारांतर्गत खेळू लागले. झिम्बाब्वे क्रिकेटची विस्कटलेली घडी त्यानंतर पुन्हा नीट बसलीच नाही. मधल्या काळात काही खेळाडूंनी आपल्या या कामगिरीने झिम्बाब्वे क्रिकेट पूर्वपदावर आणण्याची, काहीशी आशा निर्माण केली त्यापैकी एक म्हणजे हॅमिल्टन मासाकात्झा. आज हमिल्टनचा वाढदिवस.

९ ऑगस्ट १९८३ रोजी झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे त्याचा जन्म झाला. २००० मध्ये तो शालेय क्रिकेट खेळत असतानाच त्याला वयाच्या सोळाव्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. पुढच्या वर्षी, २००१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ११९ धावांची खेळी त्याने केली. १७ वर्ष ३५२ दिवस इतक्‍या कमी वयात कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. सोबतच, झिम्बाब्वेसाठी शतक झळकवणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली. शिक्षणामुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र, खेळाडू व बोर्ड यांतील वादानंतर त्याला पुन्हा बोलाविण्यात आले.

https://twitter.com/ICC/status/1288436613270380544

हॅमिल्टन व्यतिरिक्त त्याचे अजून दोन भाऊ शिंगीराई व वेलिंग्टन हे सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. २०१४ बांगलादेश दौऱ्यावर तिघांचीही संघात निवड झाली होती. मात्र, त्या दौऱ्यात वेलिंग्टनला संधी न मिळाल्याने एकाच सामन्यात तिन्ही भाऊ खेळण्याची ऐतिहासिक घटना घडू शकली नाही. नंतर, वेलिंग्टन सुद्धा झिम्बाब्वेसाठी खेळला. पण, हॅमिल्टन इतकी प्रसिद्धी आणि संधी इतर दोघांना मिळाली नाही.

२००९ केनिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने दोन सामन्यात दिडशतके झळकावली होती. अशी कामगिरी करणारा झिम्बाब्वेचा तो एकमेव खेळाडू आहे. त्यावेळी त्याने, १५६ व १७८ धावांच्या खेळ्या केल्या होत्या.

अँडी फ्लॉवरसोबत मिळून द. आफ्रिकेविरुद्ध २००७ हरारे कसोटीत हॅमिल्टनने चौथ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी रचली. एकदिवसीय सामन्यातील झिम्बाब्वेसाठीच्या सर्वोच्च भागीदारीत देखील हॅमिल्टनचे योगदान आहे. २०१४ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध, सिकंदर रझासोबत सलामीला येत २२४ धावांची भागीदारी केली होती.

२०१५ मध्ये झिम्बाब्वेसाठी टी२० क्रिकेटमध्ये १००० धावा बनविणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली. २०१६ बांगलादेश दौऱ्यावर ४ टी२० सामने खेळत त्याने २२२ धावा कुटल्या. द्विपक्षीय टी२० मालिकेत हा अजूनही विश्वविक्रम आहे.

हॅमिल्टनने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केले. ३८ कसोटीत २,२२३, वनडेमध्ये ५,६५८ व टी२० मध्ये १,६६२ धावा त्याच्या नावे जमा आहेत. कसोटीत १६ व वनडेत ३९ बळी घेत आपल्या अष्टपैलूत्वाचे देखील त्याने दर्शन घडवले. झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फ्लाॅवर बंधू व ब्रेंडन टेलर यांच्यानंतर हॅमिल्टन मासाकात्झाचा नंबर लागतो.

२०१९ मध्ये कर्णधारपदी असतानाच हॅमिल्टनने निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीच्या अगदी, एका महिन्यानंतर त्याला झिम्बाब्वे क्रिकेटचा पहिला संचालक बनविण्यात आले.

ट्रेंडिंग लेख –

क्रिकेट जगतातील हे दिग्गज ५ खेळाडू, ज्यांना हासताना चाहत्यांनी फारच क्वचित पाहिले

हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल

आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री

महत्त्वाच्या बातम्या – 

संघसहकाऱ्याच्या ‘त्या’ कृत्यामुळे संपले ‘या’ दिग्गज खेळाडूचे करिअर; कसोटीच्या एका डावात घेतल्या होत्या ९ विकेट्स

विलियम्सनला खास बर्थडे गिफ्ट देत ‘या’ खेळाडूने केली भारतीय चाहत्याची बोलती बंद

एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---