आयपीएल १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होतेय. दरवर्षी एप्रिल-मे मध्ये आयोजित होणारी ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे यावर्षी पुढे ढकलण्यात आली होती. आयपीएल खेळायला मिळावी, ही भारतातील युवा खेळाडूंसोबतच विदेशी खेळाडूंची देखील इच्छा असते. प्रत्येक देशातील जवळपास सगळे दिग्गज आयपीएलमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतात.
पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असे काही दिग्गज आहेत ज्यांनी आजवर आयपीएल खेळलेली नाही आणि कदाचित ते कधीच ही स्पर्धा खेळू शकणार नाहीत. आज, आम्ही तुम्हाला अशा ५ दिग्गज खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे कदाचीत कधीच आयपीएल खेळू शकणार नाहीत.
१) बाबर आझम
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम टी२० क्रिकेटचा नवा राजा मानला जातो. गेल्या काही वर्षांत उत्तम कामगिरी करत बाबरने आयसीसी टी२० क्रमवारीत पहिला क्रमांक मिळविला आहे.
जगभरातील खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतात, परंतु पाकिस्तान आणि भारत यांच्यातील खराब संबंधांमुळे पाकिस्तानी खेळाडू या प्रसिद्ध स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. आयपीएलच्या पहिल्या सत्रानंतर, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कोणताही खेळाडू आयपीएलचा भाग नाही.
बाबर आझमची कामगिरी पाहता कोणताही संघ त्याला तगडी रक्कम मोजून संघात समाविष्ट करू शकतो. पण, दोन देशांमधील संबंधांबद्दल कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे, बाबर आझम भविष्यात आयपीएलमध्ये भाग घेण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
२) स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे नाव ऐकताच आपल्याला युवराज सिंगने मारलेले सहा षटकार आठवतात. २००७ च्या टी२० विश्वचषकामध्ये युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूत ६ षटकार मारत एक अनोखा विक्रम केला होता. ब्रॉडने नुकतेच कसोटीत ५०० बळी पूर्ण केले आहेत.
आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, ब्रॉडने २०११ आयपीएल लिलावात आपले नाव टाकले होते. पंजाबच्या संघाने त्याच्यावर बोली लावत त्याला सांगत सामील करून घेतले. मात्र स्पर्धेच्या आधी तो दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.
यानंतर मात्र, ब्रॉडने आयपीएल लिलावाला कधीही नाव पाठवले नाही. २०१५ नंतर त्याने टी२० क्रिकेट खेळणे सोडून दिले आहे. त्यामुळे, ३३ वर्षीय ब्रॉड कधीही आयपीएल खेळू शकणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
३) मुशफिकुर रहीम
बांगलादेश क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज व माजी कर्णधार मुशफिकुर रहीम हा बांगलादेश संघाचा मुख्य खेळाडू आहे. दरवर्षी लिलावात नाव असूनही आत्तापर्यंत त्याला एकाही संघाने खरेदी केले नाही. रहीमने आयपीएल २०२० च्या लिलावात ७५ लाखांच्या बेस प्राइससह नाव नोंदवले होते.
कमी किंमतीनंतरही कोणत्याही फ्रेंचायझीने या त्याला खरेदी करण्यात रस दाखविला नाही आणि रहीम विकला गेला नाही. आकडेवारीचा विचार केला तर रहीमने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १९९.३३ च्या स्ट्राइक रेट आणि २०.७० च्या सरासरीने १२६५ धावा केल्या आहेत. यावर्षी, न विकल्या गेल्यानंतर हा बांगलादेशी खेळाडू कदाचीत कधीही आयपीएल खेळू शकणार नाही, हे सांगता येऊ शकते.
४) जो रूट
इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूटचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘फॅब फोर’ मध्ये होतो. परंतु, रूट आजपर्यंत कधीही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळलेला नाही. खरं तर, या दिग्गज खेळाडूची प्रतिमा जगभरात एक कसोटीतज्ञ म्हणून तयार झाली आहे. त्यामुळेच कदाचित तो आयपीएलचा भाग बनू शकला नाही.
रूटच्या टी २० च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास त्याने ३५.७२ च्या सरासरीने आणि १२६.३० च्या स्ट्राइक रेटने ८९३ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२० च्या लिलावाच्या ऐन अगोदर रूटने लिलावातून आपले मागे घेतले होते. लिलावातून आपले नाव मागे घेण्यापूर्वी त्याची आधारभूत किंमत १.५०० कोटी होती.
५) नॅथन लिओन
या यादीतील शेवटचे नाव ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लिओन याचे आहे. आयपीएल २०२० च्या लिलावात नॅथन लिओनची आधारभूत किंमत १.५० कोटी होती, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याला संघात सामील घेण्याचे धाडस दाखवले नाही.
त्याआधी, २०१८ च्या आयपीएलच्या लिलावातही नॅथन लिओन विकला गेला नव्हता. लिओन तसाही कसोटी गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारीसुद्धा खूप प्रभावी आहे. लिओनने ९६ कसोटी सामन्यात ३९० बळी घेतले आहेत.
नॅथन लिओनने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत फक्त दोन टी२० सामने खेळले आहेत आणि फक्त एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. लिओनची टी२० आकडेवारी पाहिल्यास तो आयपीएल खेळताना दिसण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात हे ३ परदेशी खेळाडू…
टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री
महत्त्वाच्या बातम्या –
विलियम्सनला खास बर्थडे गिफ्ट देत ‘या’ खेळाडूने केली भारतीय चाहत्याची बोलती बंद
एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…