भारत हा क्रिकेटमध्ये जगातील सर्वात यशस्वी देशांपैकी एक आहे. भारतात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला दिसून येतात भारतात क्रिकेटचे खूप वेड आहे. भारत हा पाहिला संघ आहे, ज्यांनी पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर घरच्या मैदानावर आयसीसी विश्वचषक जिंकणाराही भारत हा पहिला देश होता. याच भारतात अनेक प्रतिभाशाली क्रिकेटपटू आहेत. परंतु सर्वच खेळाडू हे भारतीय संघात खेळू शकत नाही. त्यामुळे ते दुसऱ्या देशाकडून आपले नशीब आजमावून पाहतात. तर काहींचे कुटुंबीय त्यांच्या जन्मापुर्वी किंवा नंतर परदेशात वसतात. त्यामुळे ते दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात.
आपण भारतीय क्रिकेटपटूंना बाहेरच्या देशातील लीग खेळताना बघितले नाही. याचे कारण असे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्यांना बाहेर देशातील लीग खेळण्यास परवानगी देत नाही. परंतु भारतीय वंशाचे खेळाडू, जे परदेशी संघाचे प्रतिनिधित्त्व करतात, त्यांना ही संधी लाभते. या लेखात आपण असे ४ खेळाडू बघणार आहोत, जे भारतीय वंशाचे आहेत आणि ते पाकिस्तान सुपर लीग खेळतात.
१. समित पटेल
समित पटेल हा एक भारतीय वंशाचा खेळाडू आहे, जो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करतो. अनेक क्रिकेट चाहत्यांना माहित असेल की समित हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी करतो व उजव्या हाताने गोलंदाजी करतो. समिती पटेल याने इंग्लंड संघासाठी आतापर्यंत ६ कसोटी, ३६ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये समित पटेल हा लाहोर कलंदर्स संघाकडून खेळतो. या ३६ वर्षीय खेळाडूने क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात आपले नाव गाजवले आहे. परंतु त्याला आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) मध्ये खेळण्याची संधी नाही मिळाली.
२. सुनील नरेन
पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स संघाकडून खेळणारा भारतीय वंशाचा आणखी एक क्रिकेटपटू म्हणजेच वेस्ट इंडीजचा रहस्यमय फिरकीपटू सुनील नरेन आहे. समित पटेलप्रमाणेच सुनील नरेनही बर्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. परंतु टी-20 लीगमध्ये तो नियमितपणे खेळतो.
सुनील नरेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. त्याच्या रहस्यमयी फिरकीने अनेक फलंदाजांना त्रास दिला आहे आणि आता तो त्याच्या फलंदाजीद्वारे वेगवान धावाही करू शकतो.
३. दिनेश रामदिन
दिनेश रामदिन हा भारतीय वंशाचा आणखी एक खेळाडू आहे जो पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स संघाचा सदस्य आहे. दिनेश रामदिन हा यष्टीरक्षक फलंदाज असून त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
दिनेश रामदिनने २०० हून अधिक ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले आहेत. समित पटेलप्रमाणेच त्यालाही इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) मधील कोणत्याच फ्रॅंचाईसने खेळण्याची संधी दिली नाही.
४. रवी बोपारा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा रवी बोपारा हा भारतीय वंशाचा अष्टपैलू खेळाडू आहे. बोपारा हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, जो टी -२० कारकीर्दीत अनेक आयपीएल संघांचा सदस्य राहून गेला आहे.
रवी बोपारा हा संघासाठी फलंदाजीमध्ये जोरदार फटकेबाजी करू शकतो. तो त्याच्या मध्यम गतीच्या गोलंदाजीने काही विकेट्सही घेऊ शकतो. ज्यामुळे मुल्तान सुलतान संघाने त्याच्यासोबत पाकिस्तान सुपर लीगमध्ये करार केला होता. तो पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२१ मध्ये पेशावर झल्मीकडून खेळतो आहे आणि कराची किंग्ज विरूद्ध त्याने ५८ धावाही ठोकल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
द्रविडने मॅचविनर खेळाडूंची रांग लावली, भारतीय संघाचं चित्र पालटलं; परदेशी खेळाडूकडून स्तुती
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!
अश्विनला सर्वकालिन सर्वोत्तम न म्हणणाऱ्या मांजरेकरांचा बड्या खेळाडूकडून बचाव, म्हणाले…