आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात संघांनी भारतीय खेळाडूंवर खूप पैसे खर्च केला आहे. तसेच, युवा खेळाडूंवर पण फ्रँचायझीने कोट्यावधी खर्च केले. आयपीएल २०२२मधील सर्वात महागडा खेळाडू मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू ईशान किशन ठरला. मेगा लिलावात सर्वाधिक विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत टॉप- ५ खेळाडूंपैकी चार भारतीय खेळाडू आहेत.
आयपीएल मेगा लिलावात काही खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही. त्यांना कोणत्याच संघाचा भाग बनवण्यात आले नाही. या खेळाडूंनी भारतीय संघासाठी मागील काही काळात अनेक सामने खेळले आहेत. तरीही हे खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये विकले गेले नाहीत. या लेखात आपण अशा ४ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात, ज्यांनी गेल्या एका वर्षात भारतीय संघांचे प्रतिनिधित्व करूनही आयपीएल २०२२ लिलावात त्यांच्यावर एकाही संघाने बोली लावली नाही.
१. हनुमा विहारी
भारतीय संघाचा उजव्या हाताचा फलंदाज हनुमा विहारीने (Hanuma Vihari) कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने आपली क्षमता सिद्ध केली आहे. हैदराबादच्या क्रिकेटपटूने श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या दोन कसोटीत भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकासह एकूण १३४ धावा केल्या होत्या. विहारी काही काळात आयपीएलमध्ये खेळला नसला, तरी मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या आहेत.
विहारी त्याच्या मोठ्या खेळीसाठी ओळखला जातो. याचा वापर टी२० क्रिकेटमध्ये केला जाऊ शकतो. त्याला भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे, परंतु आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अशा अष्टपैलू खेळाडूला कोणीच खरेदी केले नाही.
२. चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) मागील काही काळात भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेचा भाग नव्हता. पुजाराने गेल्या वर्षभरात भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रेनबो नेशनमध्ये तीनही कसोटी सामने खेळले आहेत.
त्याच्या आयपीएल कारकिर्दीबाबत बोलायचे, तर मागील हंगामात पुजारा धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. २०२१ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसके संघाचा तो भाग होता. आयपीएल २०२१च्या मेगा लिलावात चेन्नईने त्याला त्याच्या मूळ किंमतीत विकत घेतले. लिलावात त्याच्यावर कोणीच बोली लावली नाही.
३. संदीप वॉरियर
तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरसुद्धा (Sandeep Warrier) या यादीत आहे. त्याने गेल्या वर्षी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करूनही आयपीएल २०२२ लिलावात विकला गेला नाही. वॉरियरने जुलै २०२१ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. त्याला आयपीएल २०२२ मध्ये संधी मिळाली नाही. संदीप गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. मात्र, गेल्या वर्षी त्याने चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे त्याला लिलावात कोणीच विकत घेतले नाही.
४. इशांत शर्मा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) हा देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली असून देखील आयपीएल २०२२ मध्ये तो विकला गेला नाही. या वेगवान गोलंदाजाने नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. २०२२मध्ये आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सचा भाग बनला. त्याला संघाने खेळण्याची संधीही दिली होती, पण गोलंदाजीत तो काही खास पराक्रम दाखवू शकला नाही. त्यामुळेच या दिग्गज खेळाडूला २०२२च्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी करण्यात कोणी रस दाखवला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आयपीएल २०२३मध्ये विराट होऊ शकतो…’, अनुभवी फिरकीपटू अश्विनचे हैराण करणारे वक्तव्य
लखनऊ फ्रँचायझीच्या जर्सीवरील ‘गरूड’ चिन्हाचा अर्थ काय? खुद्द संघ मालकानेच दिलं उत्तर
आयपीएलचं विजेतेपद जिंकलं नसलं, तरीही विराटच आहे टी२० क्रिकेटचा ‘किंग’, रोहितचा लागतो ‘हा’ क्रमांक