भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगचा रोमांच आपण सर्वांनी पाहिला. आतादेखील आयपीएलचे उर्वरित दोन सामने बाकी आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्याबाबत एक घडलेली वाईट बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्याच्या आयुष्यात कौटुंबिक वाद सुरु आहेत. त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच त्याच्यापासून वेगळी होऊ शकते. सध्या जर हार्दिक त्याची पत्नी नताशापासून वेगळा झाला. तर प्रथमच असं होणार नाही की, भारतीय खेळाडू त्यांच्या पत्नीपासून वेगळे होत आहेत.
याआधी देखील भारतीय खेळाडूंची लग्न तुटली आहेत. त्यामध्ये आज आपण अशा 4 भारतीय खेळाडूंची माहिती पाहणार आहोत. ज्यांची लग्न तुटली आहेत.
(1) विनोद कांबळी- विनोद कांबळी हे भारताचे माजी फलंदाज आहेत. एकवेळी ते भारताचे दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्यांनी त्यांच्या पहिल्या 4 कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले होते. त्यांनी सर्वांना दाखवून दिलं की त्यांच्यात खेळण्याची क्षमता आहे. विनोद कांबळी यांनी 1998 मध्ये नोएला लुईसशी लग्न केलं होत. मात्र त्यांचा संसार जास्त दिवस टिकू शकला नाही. काही दिवसांनंतर त्यांचा घटस्पोट झाला.
(2) मोहम्मद अजरुद्दीन- मोहम्मद अजरुद्दीन हे भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. भारतीय क्रिकेट संघात त्यांची बरीच वर्षे कारकीर्द टिकली. त्यांनी जेवढ भारतीय क्रिकेट संघात यश मिळवलं. तेवढं कौटुंबिक आयुष्यात यश प्राप्त करु शकले नाहीत. 1987 मध्ये त्यांचं लग्न नौरीन हिच्याशी झालं. परंतु काही काळानंतर अजरुद्दीन बाॅलिवूड अभिनेत्री संगिता बिजलानीच्या प्रेमात पडल्यानं त्यांचा नौरीनशी 1996 मध्ये घटस्पोट झाला.
(3) दिनेश कार्तिक- दिनेश कार्तिक यासुद्धा खेळाडूचं नाव यादीत आहे. आयपीएल 2024च्या एलिमिनेटर सामन्यानंतर कार्तिकनं निवृत्तीची घोषणा केली. दिनेशनं पहिलं लग्न निकिता हिच्याशी केलं होतं. मात्र ती त्याच्यासोबत जास्त दिवस राहू शकली नाही. ती भारतीय संघाचा माजी खेळाडू मुरली विजयच्या प्रेमात पडली. या कारणाने दिनेश कार्तिकचा आणि निकिता यांचा घटस्पोट झाला.
(4) शिखर धवन- भारतीय संघाचा माजी सलामीवीर तसंच दिग्गज खेळाडू शिखर धवन क्रिकेटच्या मैदानावर जेवढा यशस्वी राहिला. तेवढा त्याच्या कौटुंबिक आयुष्यात यशस्वी राहिला नाही. धवनने 2012 मध्ये आयशा मुखर्जी सोबत लग्न केलं. परंतु काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा देखील आहे.
महत्वाच्या बातम्या-
“ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना हेड कोच साठी कुठलीही ऑफर दिलेली नाही”, जय शाह यांच्याकडून सारवासारव
एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, “आम्ही सन्मानासाठी खेळलो आणि…”
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या नात्यात दुरावा? इंस्टाग्रामवरून आडनाव हटवल्यामुळे खळबळ!